सांगली : आर्थिक देवाणघेवाणमध्ये मध्यस्थी केल्याने एकाचे अपहरण; जत तालुक्यातील लवंगा येथील घटना  | महातंत्र








जत; महातंत्र वृत्तसेवा : लवंगा (ता.जत )येथे आर्थिक देवाण-घेवाणच्या व्यवहारात मध्यस्थी का केली आहे, असा जाब विचारत आमचे पैसे तुम्हीच दिले पाहिजे असे सांगत एका व्यक्तीचे अपहरण केले आहे. मारुती रखमाजी लोखंडे (वय ५५) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रमेश मारुती लोखंडे यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी सदाशिव बलोगी , बसवराज कल्याण हिरपडसलगी , इरांना (पूर्ण नाव माहित नाही), गुळाप्पा सिद्धनाथ (सर्व रा. काकणगी , बबलेश्वर ता. जि . बागलकोट) विजयपूर या चौघाजणावर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लवंगा येथील मारुती लोखंडे यांनी सुखदेव चौगुले यांना पैशाची गरज होती याकरिता चौगुले व सदाशिव बलोगी यांच्यात मध्यस्थी करत चौगुले यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्यात आला होता दरम्यान चौगुले यांनी सदरचा व्यहावर पूर्ण केला नाही. या कारणास्तव बलोगी यांनी ३० ऑगस्ट रोजी अपहरित व्यक्ती मारुती लोखंडे यांची लवंगा येथील वगरे वस्ती या ठिकाणी मोटरसायकल अडवून करेवाडी गाव कोठे आहे ?अशी विचारणा केली व नंतर चौघांनी लाथा बुक्क्याने मारहाण करत सुखदेव चौगुले यांच्याशी आर्थिक व्यवहार तुमच्या मध्यस्थीने झाला आहे. त्यांच्याकडून पैसे आणून द्या असे सांगत चार चाकी गाडीत जबरदस्तीने बसून अपहरण केले आहे. सदरची घटना नोंद असून अधिक तपास उमदी पोलिस करत आहे.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *