KL Rahul : कधी कधी चुका…; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल

KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना 400 रन्सचं टार्गेट दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 28.2 ओव्हरमध्ये 217 रन्सवर ऑल आऊट झाली.  

दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे. 

इंदूरच्या स्टेडियमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी आणलं तुफान

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सिरीजमधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्स गमावत 399 रन्सची खेळी केली. यावेळी ओपनर शुभमन गिल 104, श्रेयस अय्यर 105 यांनी शतकं ठोकली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 37 बॉल्समध्ये  72 रन्सची नाबाद खेळी केली. तर कर्णधार केएल राहुलने 52 रन्सचं योगदान दिलं. 

Related News

मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना पाऊस आला आणि यावेळी पावसामुळे ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 317 रन्सचं लक्ष्य मिळालं. ज्याचा पाठलाग करताना कांगारूंची टीम 28.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 217 रन्सवर आटोपले. ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉटने सर्वाधिक 54 रन्स केले. डेव्हिड वॉर्नरने 53 रन्स केले. 

प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळावर लक्ष्य द्यायला पाहिजे

टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल विजयानंतर म्हणाला, ‘सकाळी जेव्हा मी विकेट पाहिली तेव्हा मला वाटलं नव्हतं की, बॉल इतका टर्न होईल. 400 रन्स केल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. खरं तर हा आमचा निर्णय नाही. प्लेइंग-11 मध्ये निवडलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.” 

फिल्डींगसंदर्भात निराश झाला कर्णधार

राहुलने फिल्डींगबाबात निराशा व्यक्त केलीये. तो म्हणाला, ‘आम्ही काही कॅच सोडले आहेत, पण फ्लडलाइटमध्ये फिल्डींग करणं शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. आम्हाला फीट ठेवण्यासाठी टीमचे कोच सर्वतोपरी प्रयत्न करतायत. पण कधी कधी या चुका होतात. आम्ही यातून शिकू, त्यावर मात करू तसंच पुढील सामन्यात अधिक चांगले होऊ. वर्ल्डकप आता फक्त काही आठवडे दूर आहे. सर्व खेळाडूंना त्याचा भाग व्हायला आवडेल. त्यांना आव्हानांची सवय करून घेणं आवश्यक आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *