World Cup 2023 मधील १० ठळक घडामाेडी, जाणून घ्‍या सविस्‍तर | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय  विश्वचषक २०२३ स्‍पर्धेत अनेक उलेटफेर पाहायला मिळाले. दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघांनी तगड्या संघांवर विजय मिळवला. तर गतविजेता संघ इंग्‍लंडची सुमार कामगिरीही क्रिकेटप्रेमींनी पाहिली. या स्‍पर्धेत अनेक विक्रम मोडित निघाले . जाणून घेऊयात विश्वचषक २०२३ मधील ठळक घडामाेडी ….(World Cup 2023)

१. गतविजेता इंग्लंड संघाची नामुष्कीजनक कामगिरी…

गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला ९ सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. इंग्लंडने पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश या ३ संघांना पराभूत केले. मात्र, इतर सर्व सामन्यांमध्ये साहेबांच्या देशाला पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तान सारख्या दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघाने इंग्लंडला तब्बल ६९ धावांनी धुळ चारली. (World Cup 2023)

May be an image of 10 people and text

२. आशियातून अफगाणिस्तान या नव्या संघाचा उदय

विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ‘न भूतो’ अशी कामगिरी केली. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँडचा पराभव करत गुणतालिकेत ८ गुण मिळवले. शिवाय, ऑस्ट्रलियाविरुद्ध कडवी झुंज दिली. अफगाणिस्तानने आपल्या कामगिरीच्या जोरावर आशियातून एका नव्या संघाचा उदय झाल्याचे सिद्ध केले. ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया पराभवापासून वाचू शकली. ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असता तर अफगाणिस्ताने उपांत्य फेरीत धडक मारली असती.

Image

३. ‘विराट’ कामगिरीने मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडित

विश्वचषक स्‍पर्धेत भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतक झळकावले. विराटचे हे वनडे क्रिकेटमधील ५० वे शतक ठरले.  या शतकाने त्‍याने मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरचा विश्वविक्रम मोडित काढला. विशेष म्हणजे त्याने सचिनच्या उपस्थितीतचं त्याचा विक्रम मोडला. शिवाय या विश्वचषकात सर्वाधिक धावाही विराटच्याच नावावर आहेत.

ICC suspends Sri Lanka Cricket SLC following serious breach in obligations | Cricket News – India TV

४. श्रीलंकेचा क्रिकेट बोर्ड बरखास्त अन् आयसीसीची कारवाई

श्रीलंकेचीही विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिली. दरम्यान, यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आला होता. मात्र, सरकारने केलेला हस्तक्षेप श्रीलंका क्रिकेट संघाच्या अंगलट आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) श्रीलंकन संघाचे निलंबन केले आहे. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली. संघाला ९ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या खराब कामगिरीनंतर श्रीलंका सरकारने व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हा हस्तक्षेप लक्षात घेत आयसीसीने श्रीलंका संघावर निलंबनाची कारवाई केली. (World Cup 2023)

५. सुमार कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राजीनामा सत्र सुरु

इंग्लंड आणि श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानलाही या विश्वचषकात खास काही करता आले नाही. पाकिस्तानने ९ पैकी केवळ ४ सामन्यांत विजय मिळवला. शिवाय, अफगाणिस्तानकडूनही पराभव पत्करावा लागला. दरम्यान, विश्वचषकातील या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राजीनामा सत्र सुरू झाले. सर्वप्रथम निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक यांनी विश्वचषक संपण्यापूर्वीच राजीनामा दिला. यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनीही गोलंदाजांची सुमार कामगिरी लक्षात घेऊन राजीनामा देऊन टाकला. शिवाय, बाबर आझमनेही क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. (World Cup 2023)

Rohit Sharma: India captain sets extraordinary record in World Cup match against Afghanistan | The Independent

६. ‘रोहित’चं षटकारांचा बादशहा (World Cup 2023)

रोहित शर्मा विश्वचषकाच्या इतिहास ५० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. रोहित एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू आहे. शिवाय, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील त्याने आपल्या नावावर केला. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत रोहितचं षटकारांचा बादशहा ठरला आहे. (World Cup 2023)

७. भारतीय संघाची स्‍मरणीय कामगिरी

भारतीय संघाने  विश्वचषक स्‍पर्धेतील  सर्व सामने जिंकत अंतिम सामन्‍यात धडक मारली. तसेच उपांत्‍य सामन्‍यात  न्यूझीलंड वगळता सर्व प्रतिस्पर्ध्यांवर भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. विश्वचषकात भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली . विराट कोहली या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.  मोहम्मद शमीनेही आपल्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिले आहेत. (World Cup 2023)

८. मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी (World Cup 2023)

आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देशाचा हिरो बनला. बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शमीने एकट्याने सात विकेट्स घेत भारताला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर पोहचला. त्याच्या या लक्षवेधी कामगिरीनंतर प्रत्येकजण शमीच्या आयुष्यातील संघर्ष आणि मेहनतीचे तोंडभरून कौतुक करत आहेत. (World Cup 2023)

Still believe in pitching it up and taking wickets': Shami | Cricket - Hindustan Times

९. ग्लेन मॅक्सवेलची वादळी द्विशतकी खेळी

मॅक्सवेलचे द्विशतक या विश्वचषक स्‍पर्धेतील एक सर्वोत्तम खेळी ठरली. आपल्या पाचवेळा विश्वचषक विजेत्या संघावर अफगाणिस्तानकडून पराभूत व्हायची वेळ येत आहे आणि आपल्या उपांत्य फेरीच्या प्रवेश निश्चितीसाठी संघाला जिंकून देणे गरजेचे आहे हे जाणून मॅक्सवेल खेळपट्टीवर उभा राहिला. खरं तर  शारीरिकरीत्या पूर्ण कोलमडून गेला होता. मात्र, तरीही तो मैदानावर उभा राहिला. त्याच्या द्विशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचे सेमी फायनलचे तिकिट फिक्स झाले. (World Cup 2023)

World Cup 2023: Glenn Maxwell says he knew he could pull off miracle win against Afghanistan - India Today

१०. दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली ‘चोकर्स’ (World Cup 2023)

दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणून ओळखले जाते. या विश्वचषकातही या संघाला आपली ही ओळख पुसता आलेली नाही. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिकीने अनेक विश्वचषक स्पर्धांच्या लीग स्टेजमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. मात्र, प्रत्येक स्पर्धेच्या नॉक आऊटमध्ये आफ्रिकेला बाहेरचा रस्ता पाहावा लागला आहे.
(World Cup 2023)

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *