कोल्हापूर : हातकणंगले येथील वनरक्षकसह वनपाल २० हजार रुपयांची लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात | महातंत्र
हातकणंगले; महातंत्र वृत्तसेवा : जळाऊ लाकडांच्या वाहतुक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले येथील वनअधिकारी कार्यालयातील वनरक्षक मोहन आत्माराम देसाई यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी दुसरे वनपाल रॉकी केतन देसा ( रा.बाचणी ता . कागल ) यांच्यावरही हातकणंगले पोलीसात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी केली.

या घटनेतील तक्रारदार यांचा जळाऊ लाकडाचा खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे जत ( जि. सांगली, सांगोला, जि. सोलापूर ) येथुन जळाऊ लाकुड खरेदी करून ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे साईझींग व इतर ठिकाणी लाकडे पुरवतात. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे लाकूड घेऊन गाडीतून जात असता ट्रकमधील लाकडे तपासण्याच्या बहाण्याने या सरकारी कर्मचाऱ्यांनी वाहने थांबविली. यावेळी जळाऊ लाकडांच्या वाहतुक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी वन अधिकारी देसाई यांनी देसा यांचेकरीता २० हजार रुपयांची मागणी केली. तसेच देसा यांनी सदरची रक्कम वनरक्षक देसाई यांच्याकडे देण्यास सांगितले .

दरम्यान तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे व त्यांच्या सहकाऱ्यानी सापळा रचून गुरुवारी सायंकाळी वनरक्षक मोहन आत्माराम देसाई यांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. तसेच सदरची लाच घेण्यास सहमती देवुन लाचेची रक्कम घेण्याकरता देसाई यांना प्रोत्साहन दिल्याने रॉकी देसा यांनाही ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त अमोल तांबे (पुणे ), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शनानुसार सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापु साळुंके, पोहे कौ संजिव बबरगेकर, विकास माने, पो.हे.कॉ. सुनिल घोसाळकर, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. संदिप पवार, पो. कॉ. उदय पाटील, चा. पो.हे.कॉ. विष्णु कुंभार यांनी केली .

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *