मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ: कोपरगाव शहरासह तालुका बंद; दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांकडून देखील प्रतिसाद

अहमदनगर4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी कोपरगाव शहरासह तालुका बंद ठेवून मराठा बांधवांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सर्वधर्मीय नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाळा-महाविद्यालयांसह, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला.

शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधव सकाळी एकत्र आले. तेथे शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मराठा समाजातील सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अनंत डीके, साकेत नराडे, विनोद थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. दिवसभर शहरातील दुकाने बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट होता.

पदाधिकाऱ्यांनी दिले मागणीचे निवेदन

यावेळी माजी आमदार अशोक काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, विजय वहाडणे, पराग संधान, बाळासाहेब आढाव, विजय रावसाहेब आढाव, योगेश खालकर, विनय भगत, कृष्णा आढाव, बाळासाहेब देवकर, बाळासाहेब रूईकर, मनोज नरोडे, अनिल गायकवाड, अशोक आव्हाटे, स्वप्नजा वाबळे, विमल पुंडे, बीना भगत, अनिल सोनवणे, संदीप वर्पे, विजय आढाव, बाळासाहेब जाधव, अनिरुद्ध काळे, विकास आढाव, विजय जाधव, प्रसाद आढाव, चंद्रशेखर म्हस्के, शैलेश साबळे, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, प्रवीण शिंदे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात लाठीमाराचा निषेध करीत मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार संदीपकुमार भोसले व पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

इंग्रजांप्रमाणे मराठ्यांवर अन्याय

राजेंद्र झावरे म्हणाले, मराठा समाज हा सर्व समाजाचा पालकत्व स्वीकारलेला समज आहे. या समाजाने सर्वांना आरक्षण दिले. मात्र मराठ्यांना नाही, मुख्यमंत्री यांच्या सूचनेमुळे हा लाठीचार्ज झाला. इंग्रजाप्रमाणे मराठ्यावर हे सरकार अत्याचार करत आहे. कोणत्याही मराठा बांधवानी निवडणूक न लढवता याचा निषेध करावा व आपल्या नेत्यांना आपली गरज असून त्यांना ही या बाबत जाब विचारावा, असे झावरे म्हणाले.

अॅड. योगेश खालकर म्हणाले, १९८२ साली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मोर्चा नेला. मात्र आजपर्यंत मराठा समाज ह्याच मागणीसाठी संघर्ष करत आहे. मराठ्यांचे ५८ मोर्चे शांततेते पार पडले. मात्र तरीही आरक्षण रद्द केले. ७० टक्के आमदार हे मराठा असून हे फक्त जात लावण्यापुरते आहे. स्वाभिमानी मराठे कमी उरले. आपले पोर फक्त शिपाई होत आहे. आपण दिवस-रात्र एक करून नेते निवडून आणतो, तेच ते आता लक्ष देत नाही.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *