श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची आज भेट घेणार | महातंत्र








कोल्हापूर; महातंत्र वृत्तसेवा : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा वणवा पेटला असतानाच कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूरातील सकल मराठा समाजाचे आंदोलक आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी जाणार आहे. मंग‍ळवारी (दि.३१) पहाटे शाहू महाराजांच्यासह आंदोलक आंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी आणि सरसकट कुणबी दाखले मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसरा टप्पा म्हणून पाच दिवसापासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत जाईल. तसा या आंदोलनाचा वणवा सर्वत्र पेटत आहे. कोल्हापूरात गेल्या दोन दिवसापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उद्या मंगळवारी (दि.३१) आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच आंतरवाली सराटी गावाकडे रवाना होणार आहेत. तेथे जाऊन कोल्हापूरचे शाहू महाराज या आंदोलनाला पाठींबा देणार आहेत. त्यांच्यासोबत वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई,बाबा पार्टे,हर्षल सुर्वे, बाबा देसाई आदी जाणार आहेत.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *