बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक सध्या बिबट्यांचं (Leopard) माहेरघर बनलंय. नाशिकच्या विविध भागात बिबट्यांचा संचार वाढलाय. काही दिवसांपूर्वी जयभवानी रोडवर जॉगर्स दाम्पत्याला बिबट्यानं दर्शन दिलं होतं. आठवडाभरापूर्वी याच भागातील गुलमोहर कॉलनीत बिबट्यानं पादचाऱ्याला जखमी केलं. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळं  नाशिक रोड, जय भवानी रोड आणि देवळाली कॅम्प परिसरातल्या नागरिकांमध्ये घबराट पसरलीय. मात्र नाशिककरांपेक्षा बिबट्यांचा जास्त ताप झालाय तो वन विभागाला (Forest Department). ‘बिबट्या आला रे आला’ अशा अफवांचं (Rumors) पेवच सध्या फुटलंय. 

बिबट्या आला रे आला
बिबट्या दिसल्याच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होतायत. चुकीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जातायत. त्यामुळं वन विभागाची डोकेदुखी वाढलीय. गेल्या दहा दिवसांत कुठं ना कुठं बिबट्या दिसल्याची अफवा पसरते. वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी जाऊन शोध घेतात. मात्र हाती काहीच लागत नाही. बुधवारी संध्याकाळी भालेराव मळ्यात बिबट्या झाडावर बसला असल्याचा फोटो असाच व्हायरल झाला. वन विभागानं तिथं धाव घेतली, तेव्हा ती देखील अफवाच असल्याचं आढळलं.

बिबट्या आल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात वन विभागानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. कुठलीही खात्री न करता बिबट्या आल्याची अफवा पसरवल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा वन विभागानं दिलाय. अफवा पसरवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळं सोशल मीडियावर बिबट्या आल्याची किंवा अन्य कोणतीही पोस्ट टाकताना सावधान. तुमचा अतिशहाणपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

Related News

बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका तरुण शेतकऱ्यावर हल्ला केला होता. सिन्नर तालुक्यातील नायगावमध्ये विष्णू तुपे या शेतकऱ्याने आपल्या आईला दुचाकीवरुन बाजारात सोडलं त्यानंतर घराकडे परतत असताना शेताजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने विष्णूवर झेप घेतली. यात विष्णू दुचाकीवरुन खाली कोसळला. पण हिम्मत दाखवत त्याने दुचाकीचा आवाज करत बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बिबट्याने विष्णूवर चार वेळा हल्ला केला. पण सुदैवाने विष्णू तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आणि त्याचा जीव वाचला. 

त्याआधी नाशिकच्या गुलमोहर कॉलनी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.  या घटनेत तरुणाच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नाशिकमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *