10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आठव्यांदा बॅलन डी’ओर जिंकण्यात यश मिळविले आहे. मेस्सीने मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडचा पराभव करून हा पुरस्कार जिंकला.
मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. मेस्सीला इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांनी हा पुरस्कार दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे.
मार्टिनेझला जगातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार
अर्जेंटिनाचा संघ आणि अॅस्टन व्हिला गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ याला जगातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले आहे. अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये किंग्सले कोमनकडून स्पॉट-किक वाचवून मार्टिनेझने कतारमध्ये गोल्डन ग्लोव्ह जिंकला. अॅस्टन व्हिला प्रीमियर लीगमध्ये सातवे स्थान मिळवण्यात आणि युरोपा कॉन्फरन्स लीगमध्ये स्थान मिळवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
मँचेस्टर सिटीने क्लब ऑफ इयरचा पुरस्कार जिंकला
मँचेस्टर सिटीला सलग दुस-या वर्षी या पुरस्कारांमध्ये क्लब ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले. गेल्या मोसमात चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग आणि एफए चषक स्पर्धा जिंकणारा मँचेस्टर संघ हा दुसरा इंग्लिश संघ ठरला.
बॅलन डी’ओर पुरस्कार म्हणजे काय?
बॅलन डी’ओर हा फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ही परंपरा 1956 पासून सुरू आहे. यापूर्वी ते फक्त पुरुष खेळाडूंना दिले जात होते. आता ते 2018 पासून महिला खेळाडूंना दिले जात आहे.