धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डवर हल्ला; कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या हल्लेखोराला बेड्या | महातंत्र
डोंबिवली; महातंत्र वृत्तसेवा : धावल्या रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता महिला प्रवाशांची सुरक्षा करणाऱ्या महिला होमगार्डवरही हल्ला करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डवर हल्ला करणाऱ्या बदमाशाला कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी 24 तासांच्या आत मुसक्या आवळून गजाआड केले आहे.

हा प्रकार कसारा लोकलमध्ये घडला आहे. वशिंद ते आसनगाव दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये महिला होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या नीरजा मुकादम या आरक्षित महिला जनरल डब्यात पेट्रोलिंग करत होत्या. महिलांच्या डब्यात मारूती अत्राम याने घुसखोरी केल्याने होमगार्ड नीरजा यांनी त्याला महिला डब्यातून उतरण्यास सांगितले. या गोष्टीचा राग  मनात धरून महिला डब्यात प्रवास करणाऱ्या माथेफिरू मारुती अत्राम याने धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्ड नीरजा यांना बेदम मारहाण केली. वशिंद स्टेशन येताच त्याने स्टेशनवर उतरून पळ काढला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात महिला होमगार्ड नीरजा यांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख, पीएसआय जावळे या अधिकाऱ्यांसह शेवाळे, खाडे, देसले, जाधव, देवळे व इतर कर्मचाऱ्यांनी कल्याण ते कसाऱ्यापर्यंतच्या सर्व स्टेशनवर आरोपीचा माग काढून 24 तासांच्या आत त्याला ताब्यात घेतले. या बदमाशाने अश्या पध्दतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *