गाेवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा कायम: महाराष्ट्राला पहिल्यांदाच 45+ सुवर्ण; छत्रपती संभाजीनगरचा धावपटू तेजस विक्रमासह चॅम्पियन

  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Continues To Dominate The National Sports Competition At Gaeva

पणजी31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरच्या धावपटू तेजस शिर्सेने आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवताना साेमवारी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. फेडरेशन कपमध्ये सर्वाेत्कृष्ट धावपटूचा पुरस्कार विजेत्या तेजसने पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्समध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने १३.७१ सेकंदांत निश्चित अंतर गाठले. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू दिया चितळेने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने आपल्या सहकारी महिला खेळाडूंसाेबत सांघिक गटाचा किताब पटकावला. महाराष्ट्राची खेळाडू सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. तेजसने सकाळी या शर्यतीमधील प्राथमिक फेरीत १३.८० सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवला होता. संध्याकाळच्या सत्रात त्याने १३.७१ सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्ण जिंकले.

Related News

त्याने ओडिशाचा जीवा ग्रेशनसन (१४.१३ सेकंद) व राजस्थानचा माधवेद्र सिंग (१४.१९ सेकंद) यांना मागे टाकले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तेजसने साेनेरी यशाचा पल्ला गाठला. त्याने मे महिन्यात फेडरेशन चषक स्पर्धेत नोंदवलेली १३.६१ सेकंद ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. महाराष्ट्राची सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. तिने ही शर्यत एक तास ४१ मिनिटे १३ सेकंदांत पूर्ण केली.
महाराष्ट्राला विक्रमी सुवर्णपदके :
महाराष्ट्र संघाने यंदा स्पर्धेतील सहाव्या दिवशी विक्रमी सुवर्णपदकांचा पल्ला गाठला आहे. महाराष्ट्र संघाच्या नावे ४६ सुवर्णपदकांची नाेंद झाली आहे. महाराष्ट्राची ही पदके गत सहा स्पर्धांपेक्षा अधिक ठरली आहेत. महाराष्ट्राने २०११ झारखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४१ सुवर्णांसह १३२ पदकांची कमाई केली हाेती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघ १३२ पदकांसह चाैथ्या स्थानावर हाेता. संघाला पहिल्यांदाच सुवर्णपदकात ४१ चा आकडा गाठता आला. महाराष्ट्राला २०१५ केरळ स्पर्धेत ३० सुवर्ण व गत २०२२ गुजरात स्पर्धेत ३९ सुवर्णपदकांचा बहुमान मिळाला हाेता.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *