मेजर ध्यानचंद..लोक म्हणायचे हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे: हिटलरने म्हटले-जर्मनीकडून खेळा सैन्यात सर्वात मोठे पद देतो, मेजर म्हणाले–भारताचे मीठ खाल्ले आहे

  • Marathi News
  • Sports
  • Major Dhyan Chand Birth Anniversary Special Story Know Interesting Facts

10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मेजर ध्यानचंद…भारतीय हॉकी संघाचे स्टार.. त्यांचा जन्म 1905 मध्ये 29 ऑगस्ट रोजी दिवशी झाला. कुणी म्हणायचे की त्याxच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे. तर, काहीजण म्हणायचे ते हॉकी स्टिकवर डिंक वापरत असे. अशा हजारो कथा आहेत, काही खऱ्या तर काही निव्वळ अफवा. सत्य एवढेच आहे की, त्या काळी मेजर ध्यानचंद यांच्यापेक्षा मोठा हॉकीपटू कोणी नव्हता हे जगातील प्रत्येक हॉकीप्रेमी मान्य करतो.

आज आपण त्यांच्या काही कथा जाणून घेणार आहोत. त्यांची महानता, त्याग आणि देशाप्रती असलेले समर्पण या कथांमधून कळेल. ध्यानचंद यांचा जन्म शहरात कोठे झाला हे कोणालाच माहीत नाही अशा शहराबद्दलही आपण बोलू. शहरात त्यांच्या नावाचे स्टेडियम किंवा स्मारक नाही. चला तर मग जाणून घेऊ…

प्रयागराजमध्ये कुठे जन्म झाला, कोणालाच माहिती नाही

ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. अलाहाबादचे नाव आता प्रयागराज झाले आहे. ध्यानचंद यांचा जन्म जिल्ह्यात कुठे झाला, याबाबत काहीही नक्की माहिती नाही. काही लोक मुठीगंज म्हणतात तर कोणी ओल्ड कॅन्ट म्हणतात. दोन्ही बाजूंचे आपापले युक्तिवाद आहेत. जुन्या कँटचे रहिवासी सांगतात, “ध्यानचंदचे वडील सोमेश्वर सिंग हे ब्रिटिश-भारतीय सैन्यात कारकून होते. ध्यानचंद यांचा जन्म ओल्ड कॅंटमध्ये असताना झाला.” मुठीगंजचे लोक म्हणतात, “येथे एक जुने मंदिर होते तिथे सोमेश्वरजी राहत असत, तेव्हा ध्यानचंदचा जन्म झाला.”

ध्यानचंद यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे नाव ध्यानसिंग होते. ते 5 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची झाशी येथे बदली झाली. तिथेच अभ्यास सुरू झाला आणि खेळही. ध्यानचंद यांना हॉकी एवढे आवडायचे की, ते रात्री चंद्राच्या प्रकाशात सराव करायचे. यामुळेच त्यांचे नाव ध्यानसिंग वरून बदलून ध्यानचंद करण्यात आले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी भारताकडून खेळायला सुरुवात केली. वयाच्या 43 व्या वर्षापर्यंत देशासाठी खेळत राहिले.

ध्यानचंद यांचे नाव ध्यानसिंग होते. चंद्राच्या प्रकाशात सराव केल्याने त्यांचे नाव ध्यानचंद झाले.

ध्यानचंद यांचे नाव ध्यानसिंग होते. चंद्राच्या प्रकाशात सराव केल्याने त्यांचे नाव ध्यानचंद झाले.

सराव सामन्यात जर्मनीकडून पराभव, त्याचा बदला अंतिम फेरीत घेतला
1936 मधील ऑलिम्पिक जर्मनीच्या बर्लिन येथे आयोजित करण्यात आले होते. जर्मनीशी सराव सामना. भारत 4-1 ने हरला. सराव सामन्यातील या पराभवाने कुणालाही फरक पडला नाही. पण ध्यानचंद मात्र खूप नाराज झाले. त्यांनी त्यांच्या ‘गोल’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “या पराभवाने आम्हाला इतके हादरवून सोडले की आम्ही संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही, आम्ही ताबडतोब INS दारा यांना भारतातून जर्मनीला इनसाइड राइटवर खेळण्यासाठी एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.”

भारताने हंगेरी, अमेरिका, जपान आणि फ्रान्सला एकतर्फी लढतीत पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारताने 30 गोल केले, पण त्यांच्याविरुद्ध एकही गोल झाला नाही. अंतिम सामना 14 ऑगस्टला जर्मनी विरुद्ध होणार होता पण पावसामुळे हा सामना 15 ऑगस्टला झाला.

काँग्रेसच्या झेंड्याला वंदन करून गोलचा पाऊस पाडला
बर्लिनच्या हॉकी स्टेडियमवर 40 हजार लोक अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. संघ व्यवस्थापक पंकज गुप्ता यांनी बॅगेतून काँग्रेसचा झेंडा बाहेर काढला, सर्व खेळाडूंनी त्यांना सलामी दिली. त्यावेळी देशाचा स्वतःचा झेंडा नसल्यामुळे हे घडले. त्यांच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जर्मनीचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. भारतीय बाजूने बडोद्याचे महाराज आणि भोपाळच्या बेगम स्टेडियमवर होत्या.

खेळ सुरू झाला. पहिली 35 मिनिटे भारत बचावात्मक खेळला. फक्त एक गोल शूट केला. यानंतर ध्यानचंद यांनी स्पाइक शू काढला. अनवाणी खेळत त्यांनी एकापाठोपाठ गोल करायला सुरुवात केली. जर्मन संघाने आक्रमक हॉकी खेळायला सुरुवात केली पण तोवर भारतीय संघ 8-1 ने पुढे गेला होता. ध्यानचंद यांना जर्मनीच्या गोलकीपरची हॉकी स्टिक एवढी जोरात लागली की त्यांचे दात तुटले. तोंड सुजले. खेळ थोडावेळ थांबल्यानंतर ध्यानचंद उपचारानंतर लगेचच मैदानात परतले आणि सहकाऱ्यांना म्हणाले, “आता गोल करू नका. चेंडूवर नियंत्रण कसे ठेवायचे असते ते, प्रतिस्पर्ध्यांना दाखवून द्या.”

हिटलरच्या सैन्यातील सर्वोच्च पदाची ऑफर नाकारली
ध्यानचंद यांच्या खेळाने सारे जग प्रभावित झाले. त्यावेळी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याबदल्यात लष्करातील सर्वोच्च पदाची लालूच देण्यात आली. ध्यानचंद हे त्यावेळी भारतीय लष्करात फक्त लान्स नायक होते. मात्र त्याने जर्मनीकडून खेळण्यास नकार दिला. “मी भारताचे मीठ खाल्ले आहे, फक्त भारतासाठीच खेळणार” असे म्हटले.

ध्यानचंद खेळायचे तेव्हा चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटायचा. भारताचा नेदरलँडशी सामना होता. भारताने सामना जिंकल्यावर लोकांनी ध्यानचंद यांना रोखले. त्यांची हॉकी स्टिक तोडली. कारण त्यांच्या स्टिकमध्ये चुंबक असल्याचा संशय लोकांना आला होता. पण, ती तोडल्यानंतर त्यात काहीच नसल्याचे दिसून आले.

त्याचप्रमाणे जपानमधील जपानी खेळाडूंनी ध्यानचंद यांची स्टिक तपासली. त्यांना त्यांच्या काठीला डिंक असल्याचा संशय आला, त्यामुळे चेंडू फक्त त्यांच्याकडेच राहिला. येथेही तपासणी केल्यानंतर जपानच्या खेळाडूंची निराशा झाली.

एका वर्षात 133 गोलचा विश्वविक्रम ​​​​​​​
भारतीय संघाने 1932 मध्ये एकूण 37 सामने खेळले. संपूर्ण संघाने मिळून विरोधी संघाविरुद्ध 338 गोल केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये केवळ ध्यानचंद यांनी 133 गोल केले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघासाठी 12 सामने खेळले. एकूण 37 गोल केले. हॉकीमध्ये भारताने तिनही वेळा सुवर्णपदक जिंकले.

मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या 43 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फावल्या वेळात ते कविता लिहायचे. 1976 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासाठी कविता लिहिली. ती कविता होती, “कभी हम उफ, कभी हाय, कभी फरियाद करते हैं, खुदाया क्यों नहीं मिलते जिन्हें हम याद करते हैं।” एकदा रेखा आणि शशी कपूर यांच्यासाठी लिहिले, “मुझे इसका गम नहीं है कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना”

3 डिसेंबर 1979 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे नाव आणि कर्तृत्व अजरामर झाले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *