मुंबई5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ममता बॅनर्जींचे स्वागत आदित्य ठाकरे यांनी केलs असून उद्यापासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होणार आहे. विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांना राखी बांधली आणि त्यांचे औक्षण केले.

मुंबईतील रुग्णालयांची स्थिती सध्या भयंकर आहे, कॉन्ट्रॅक्टर मंत्री हे त्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी मुंबई लूटत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ट्विटरवरून आदित्य ठाकरे यांनी पालिका रुग्णालयातील हलगर्जी कारभारावरून मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला.
आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयश, रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण व पालिकेच्या कारभारात बेकायदा मिंधे सरकारची होणारी ढवळाढवळ यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. “महापालिका रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत. पण पालिका प्रशासन व राज्यातील बेकायदेशीर सरकार मात्र त्यांना योग्य तो पाठिंबा देत नाहीए. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या अपयशामुळे वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

यासोबतच आदित्य ठाकरे यांनी आज नारळी पौर्णिमा, कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण. वरळी कोळीवाडा येथे कोळी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी त्यांच्या आनंदात सहभागी झालो. तसेच त्यांच्या भरभराटीसाठी दर्या सागराला साकडेघालून, त्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील बैठकीसाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांनी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी ममता दीदींनी अमिताभ यांना राखी बांधून कोलकत्त्याला येण्याचेही निमंत्रण दिले आहे. तसेच या भेटीत त्यांनी अमिताभ यांच्याबाबत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.