मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल: उपोषणामुळे प्रकृती खालावली, मुख्यमंत्री शिंदेंच्या विनंतीनंतर उपचारास तयार

छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून त्यांना रूग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये येताना मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी मराठा समाजाकडून स्वागतही करण्यात आले.

Related News

मुख्यमंत्र्यांनी केली होती विनंती

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान उपोषण स्थळीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. अशात शनिवारी (ता.16) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा केली. वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती केली होती. सुरूवातीला मी आंदोलनस्थळीच उपचार घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, नंतर सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे अखेर ते आज रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्या विनंतीप्रमाणे आज जरांगे पाटील सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटी ता. अंबड येथून छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झाले होते.

शरीराच्या होणार सर्व चाचण्या

उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांची तपासणी रुग्णालयात करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जातील.

आंतरवली सराटीत साखळी उपोषण सुरूच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते. अखेर 17 दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले असले तरी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे साखळी उपोषण सुरूच आहे. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *