आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधव एकवटले | महातंत्र








कणकवली; महातंत्र वृत्तसेवा : जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेले सात दिवस उपोषणास बसले आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत तालुक्यात मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी  पर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी मेणबत्ती पेटवत समाज बांधवांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला.

या कँडल मार्चमध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाचे नेते एसटी सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, सोमा गायकवाड, रामदास विखाळे, सचिन सावंत, रिमेश चव्हाण, राजू राणे, योगेश सावंत, उद्योजक सतीश नाईक, संदीप राणे, दामू सावंत, संतोष परब, महेंद्र सांबरेकर, लवु वारंग, अनंत राणे, सचिन सावंत, रुपेश आमडोसकर, अजय सावंत, भाई साटम, औदुंबर राणे, सखाराम सपकाळ, अनुप वारंग, अभिजीत सावंत, तेजस राणे, मंगेश सावंत, उपस्थित समाजाच्यावतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आदी उपस्थित होते.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *