Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार आहेत. आजचा दिवस या आंदोलनासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा असणार आहे. जाणून घेऊयात याचबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी…
1) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपाचे आमदार नितेश राणेंसहीत रविवारी सायंकाळी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलकांना भेटले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारच्यावतीने महाजन यांनी केली.
2) पुढील 2 दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी महाजन यांच्याकडे आपली बाजू मांडताना केली. मात्र 2 दिवसांमध्ये निर्णय घेणं शक्य नाही मागण्यांसाठी 1 महिन्यांचा वेळ देण्याची विनंती गिरीश महाजनांकडून करण्यात आली. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याने जालन्यातील उपोषण सुरुच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
नांदेड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क एका आमदाराने (MLA) पोलीस (Police) अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे. विना नंबरची दुचाकी सोडून देण्याची मागणी आमदाराने केली होती, मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने या...
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
3) मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आज (4 सप्टेंबर 2023 रोजी) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे.
4) मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
5) मुंबईतील या बैठकीला औरंगाबाद विभागीय आयुक्त तसंच जालना, नांदेड, लातूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
6) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यामधील अंतरवाली सराटी गावाला भेट देण्यासाठी सकाळीच रवाना झाले आहेत. रविवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज यांनी फोनवरुन जरांगे यांच्याशी संवाद साधला होता.
7) मनसे आंदोलकांच्या पाठीशी आहे असं राज यांनी जरांगेंना सांगितलं. त्यानंतर जरांगेंनी पोलिसांनी लाठीमार का केला याचा जाब सरकारला विचारला पाहिजे असं राज यांच्याशी संवाद साधताना म्हटलं.
8) जालनातल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
9) महसूल मंत्री राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांच्या दालनात उद्या ही बैठक पार पडणार आहे. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी काय करता येईल याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.
10) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती फडणवीसांनी जरांगेंना दिली.
11) पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला पाहिजे होता. सरकार पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत नसल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं आहे.
12) जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. तसंच सभा, मिरवणुका आणि मोर्चावरही बंदी असेल. अप्पर जिल्हाधिका-यांनी हे आदेश लागू केले आहेत.
13) 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत. 4 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
14) पोलीस अधिक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका आणि मोर्चाला हे आदेश लागू नसतील.
15) मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिल्याने आज राज्यभरामध्ये होत असलेल्या तलाठी परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.