मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न: नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे, आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी

नांदेड30 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सरकारविरोधात मराठा समाजाचा रोष अजूनही कमी झालेला दिसत नाही. आज नांदेडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यालाल मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.

Related News

गिरीश महाजन हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. मराठा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त आज नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी गिरीश महाजन दाखल झाले. मात्र, याचवेळी मराठा तरुणांनी आंदोलन करत ‘पालकमंत्री चले जाव’ अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

सकल मराठा समाजाचा इशारा

आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांककडून करण्यात आला. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यावर समोर सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवून पालकमंत्री चलेजाव च्या घोषणा देण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नांदेडला आले होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात लोकप्रतीनिधी आणि पालकमंत्र्यानी सहभागी होऊ नये, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच सकल मराठा समाजबांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. तर, पालकमंत्र्यांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली.

लोकप्रतिनिधींविरुद्ध रोष

सरकारकडून अद्याप मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मंत्र्यांऐवजी प्रशासनाने ध्वजारोहण करावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. मंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाज बांधवाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली होती. तयावेळी मराठा समाजातील अनेक बांधवांनी जिल्हाधिकारी यांना प्रशासन आणि समाज बांधवांमध्ये समन्वय आहे, तसा समन्वय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांमध्ये नाही, त्यामुळे समाजात लोकप्रतिनिधींविरुद्ध प्रचंड रोष असल्याचे सांगितले होते.

पोलिसांचा बंदोबस्त

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणास पालकमंत्र्यांनी येऊ नये, आमचा त्यास विरोध राहील असा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कार्यक्रमाच्या स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

हेदेखील वाचा

मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे:मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची प्रतिज्ञा, हुतात्म्यांना केले अभिवादन

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला आज 75 वर्षे पूर्ण होत आहे. म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आज अमृत महोत्सव दिवस आहे. त्यानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजलील वाहिली. मराठवाड्याला मागास या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहीजे. मराठवाडा समृद्ध व्हावा, अशी आपण प्रतिज्ञा करुया, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *