Maratha Reservation in Kolhapur
कागल; महातंत्र वृत्तसेवा : मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक गावच्या सरपंच दाम्पत्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा आजचा तिसऱ्या दिवशी आहे, दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कागल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ( Maratha Reservation in Kolhapur )
संबंधित बातम्या
सरपंच सौ. नलिनी कृष्णात सोनोळे व कृष्णात सदाशिव सोनोळे यांनी गेल्या तीन-चार दिवसापासून कागल तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सोनोळे दाम्पत्यांनी उपोषण सुरू केले आहे. गावातील नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. सलग दोन-तीन दिवस रात्रदिवस उपोषण सुरू केल्यामुळे सोनोळे दाम्पत्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रात्री उशिराने कागल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सरपंच सौ. नलिनी सोनोळे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर पती कृष्णात सोनोळे यांनी उपचार घेतल्यानंतर पुन्हा उपोषण ठिकाणी जाऊन उपोषण कायम सुरू ठेवले आहे. त्यांच्या या उपोषणाला संपूर्ण जिल्ह्यातील विविध संघटना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच त्यांची ग्रामीण रुग्णालयात जाऊन अनेकांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे. ( Maratha Reservation in Kolhapur )