Maratha Reservation Protest Jalna : मुख्यमंत्र्यांकडून जालन्याच्या घटनेचे चौकशीचे आदेश | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन : Maratha Reservation Protest Jalna : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ‘महातंत्र न्यूज’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक खुलासेही केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘लाठीमाराची घटना दुर्दैवी आहे. मी याबाबत जिल्हाधिकारी, आणि एसपींकडून माहिती घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्याशी मी स्वत: चर्चा केली होती. प्रशासनाच्या अधिका-यांसोबतही बोललो होतो. पण मनोज पाटील हे उपोषणाबाबत ठाम होते. अशातच त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पाटील यांना एसपी आणि जिल्हाधिका-यांनी रुग्णालयात ॲडमिट व्हावे अशी विनंती केली. पण गुरुवारी घटनास्थळी दगडफेक झाल्याचे एसपी आणि जिल्हाधिका-यांनी माहिती दिली. यानंतर लाठीचार्ज झाला’, असे त्यांनी ‘महातंत्र न्यूज’शी बोलताना सांगितले. (Maratha Reservation Protest Jalna)

सरकार मराठा समाजाच्या बाजूनेच आहे. विरोधकांनी घटनेचे राजकीय भांडवल करू नये. कुणाच्या जीवशी खेळू नये. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केले. (Maratha Reservation Protest Jalna)









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *