महातंत्र ऑनलाईन : हे सरकार निर्घृण आहे, मराठा आंदोलकांचा नेमका गुन्हा काय? गोळ्या चालवण्याचे आदेश कुणी दिले? आंदोलक म्हणजे दहशतवादी आहेत का? असे सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकरला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. जालना येथे ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली. (Maratha Reservation Protest Jalna)
उद्धव ठाकरे आज जालन्याला येथे पोहचून त्यांनी अंतरवाली सराटी येथे भेट दिली. त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवर जालेल्या लाठीचार्जचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला. ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि लाठीचार्जच्या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र ही संतांची जशी भूमी आहे तशीच ती विरांचीही भूमी आहे. मविआ सरकार असताना मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षणाची मागणी आजची नाही. एकाही आंदोलकावर गुन्हा दाखल होऊ नये. आंदोलकांना काही जणांना भडकावण्याचा प्रयत्न करतील. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेच पाहिजे.’ (Maratha Reservation Protest Jalna)
जालन्यातील लाठीचार्ज मागे सरकारच आहे. मोदी सरकार हिंदू द्वेष्टा सरकार आहे. लाठीचार्जमागे सरकारने आदेश दिले. सरकार तुमच्या दारी, पोलिस तुमच्या घरी अशी राज्याची अवस्था आहे, असे घणाघात आरोप ठाकरे यांनी केला. राज्यात शासकीय अत्याचार सुरु आहे. राज्यात एक फूल, दोन हाफ सरकार अशी टीका ठाकरेंनी केली. (Maratha Reservation Protest Jalna)