‘मला घाणेरडे…’; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली

Vini Raman Glenn Maxwell Wife On World Cup 2023 Final: रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप फायलनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवून सहाव्यांदा विश्वविजेता होण्याचा पराक्रम केला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेन यांच्या 192 धावांच्या पार्टनरशीपमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. तरी सामन्यातील विजयी धावा करण्याचं भाग्य ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला मिळालं. भारताचा अनपेक्षित पराभव झाल्याने अनेक भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी रडून, सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या तरी काही भारतीय चाहत्यांचा संयम सुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीला आणि मुलीला बलात्कारची धमकी काही विक्षिप्त भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावरुन दिल्यानंतर आता मॅक्सवेलच्या भारतीय वंशाच्या पत्नीलाही घाणेरडे मेसेज वर्ल्ड कप फायनलनंतर भारतीय चाहत्यांनी पाठवल्याची माहिती समोर आली आहे. असे मेसेज पाठवणाऱ्यांना मॅक्सवेलची पत्नी विनि रमणनेही सडेतोड उत्तर दिलं आहे.

विनिचा पाठिंबा भारताला की ऑस्ट्रेलियाला? तिनेच केलं स्पष्ट

मॅक्सवेलची पत्नी विनि रमणने तिला अनेकजण फार द्वेषपूर्ण आणि घाणेरडे मेसेज करत असल्याचा खुलासा इन्स्टाग्राम स्टोरीमधून केला आहे. “फार द्वेषाने भरलेले आणि घाणेरडे डायरेक्ट मेसेज पाठवणाऱ्यांनी थोडं क्लासिक राहणं गरजेचं आहे,” असा टोला विनिने पहिल्याच ओळीत लगावला आहे. “हे सांगावं लागतंय यावर विश्वास बसत नाहीये पण तुम्ही एकाच वेळेस भारतीय आणि ज्या देशात तुमचा जन्म झाला, जिथे तुम्ही लाहनाचे मोठे झालात त्या देशाचे असू शकता. खास करुन माझा नवरा आणि माझ्या बाळाचे वडील ज्या संघाकडून खेळतात त्याला मी समर्थन देऊ शकते,” असं विनिने संतापून केलेल्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्की पाहा >> मॅक्सेवेलच्या 24 कोटींच्या बंगल्यातील Inside Pics पाहिले का?

Related News

विनिने दिला खोचक सल्ला

पोस्टच्या शेवटी विनीने तिला घाणेरडे आणि द्वेषपूर्ण मेसेज पाठवणाऱ्यांना एक सल्लाही दिला आहे. “थोडी शांतात ठेवा आणि हा संताप जगातील एखाद्या फार महत्त्वाच्या विषयाबद्दल व्यक्त करा,” असं मॅक्सवेलच्या पत्नीनं म्हटलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा >> ‘..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?’ आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, ‘कथित सुशिक्षित..’

मॅक्सवेलच्या 201 नाबाद खेळीनंतर केलेली स्पेशल पोस्ट

विनि रमण ही पत्नी मॅक्सवेलबरोबर भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील काही सामन्यांसाठी प्रत्यक्षात मैदानात पतीचा पाठिंबा देण्याच्या उद्देशाने उपस्थित होती. साखळी फेरीमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मॅक्सवेलने नाबाद 201 धावा करुन ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिल्यानंतरही विनिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावना व्यक्त केलेल्या. मैदानात मॅक्सवेल फलंदाजी करत असतानाचा स्टॅण्डमधून काढलेला फोटो पोस्ट केला होता. विनि रमणने 201 नाबाद असा आकडा लिहून ऑल द इमोशन्स अशा कॅप्शनसहीत प्रेम दर्शवणारे इमोजी वापरत इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

नक्की वाचा >> ‘भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे..’; World Cup Final हरल्यानंतर जय शाहांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न

विनि ही मूळची भारतीय असून मागील वर्षीच हे दोघे लग्नबंधनात अडकले. मॅक्सवेल आणि विनि या दोघांनी तमिळ आणि ख्रिश्चन पद्धतीने 2022 साली लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मेलबर्नमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विनिची मॅक्सवेलबरोबर ओळख झाल्यानंतर हे दोघे प्रेमात पडले होते. मॅक्सवेल आणि विनिने ख्रिश्चन पद्धतीने 18 मार्च 2022 रोजी अगदी थाटामाटात या दोघांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही चांगलेच चर्चेत होते. 27 मार्च 2022 रोजी त्यांनी तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न केलं. लग्नात अगदी वधू आणि वराला उचलून घेत एकमेकांना वरमाला घातल्याचे फोटोही या दोघांनी शेअर केले होते. अगदी हळदीचा कार्यक्रमही विनि आणि मॅक्सवेलने मनापासून एन्जॉय केला होता.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *