‘मेरा दिल तूट गया…’, पाकिस्तानी तरुणीकडून किंग कोहलीला ‘लॉट्स ऑफ लव’; पाहा दिलखेच Video

Pakistani Girl Video : क्रिकेटमधील सर्वात आतुरता असलेला म्हणजेच भारत पाकिस्तान सामना (IND vs PAK) काल श्रीलंकेतील कँडी येथे पार पडला. या सामन्यात अनेकांचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं आहे. हा सामना पावसाने धुवून काढला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून देण्यात आले आहेत. गल्ली क्रिकेटप्रमाणे टीम इंडियाची बॅटिंग झाली खरी पण पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्यामुळे अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती. त्याशिवाय आणखी एक गोष्ट पाकिस्तानच्या अनेक फॅन्सला खुपत होती. ती म्हणजे विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट. मैदानात उपस्थित असलेल्या अनेक पाकिस्तानी फॅन्सने (Pakistani Girl fan) विराटच्या विकेटवर जल्लोष केला असला तरी भारतासोबत अनेक पाकिस्तानी फॅन्स निराश झाले होते. अशातच एका पाकिस्तानच्या एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.

सामना रद्द झाल्याची घोषणा झाली अन् 25 हजार प्रेक्षक निराश होऊन घरी गेले. त्यावेळी एका पाकिस्तानी तरुणीला प्रश्न विचारला गेला. या तरूणीने चेहऱ्यावर एका बाजूला पाकिस्तानचा झेंडा रंगवला होता तर दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा. त्यावेळी एका युट्यूबरने तरुणीला प्रश्न विचारले. त्यावेळी तिने आपण कोहलीची फॅन असल्याचं सांगितलं. 

आणखी वाचा – IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Related News

विराट कोहली माझा फेवरेट प्लेयर आहे. मला त्याला मॅच खेळताना पहायचं होतं. त्याला माझ्या डोळ्यांनी पाहण्यासाठी मी इथं आले होते. मला आज त्याची सेंच्यूरी बघायची होती. मात्र, माझं हृदय तुटलंय… मी पाकिस्तानला आणि इंडियाला दोन्ही संघांना सपोर्ट करत होते, असं ती तरुणी म्हणते. त्यावेळी तिच्या बाजूला उपस्थित असलेला चाचा काहीतरी म्हणतो… त्याला देखील तरुणीने प्रत्युत्तर दिलं. चाचा शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीची गोष्ट नाहीये ना!, असं ती तरुणी म्हणते. तिचं उत्तर ऐकून चाचा गप्प बसतो… त्यानंतर विराट कोहली आणि बाबर आझम यांपैकी कोणा एकाला सिलेक्ट करायचं असेल तर कोणाला करशील? असा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी तिने थेट विराट कोहलीचं नाव घेतलं.

पाहा Video

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून अनेक कमेंट देखील येत असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केलाय. ही पाकिस्तानी मुलगी मनमोकळेपणाने विराटची स्तुती करतेय. आपल्याकडे कुणी बाबर आझमचं कौतुक केलं तर त्याची कबर खोदतील, असं आव्हाड म्हणतात.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *