औरंगाबाद3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हैद्राबाद संस्थानातून मराठवाड्याला मुक्त होऊन अनेक वर्ष झाली आहेत. काही लोक जाणीवपुर्वक खोटा इतिहास सांगुन त्यास हिंदु विरुद्ध मुस्लीम असा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. तो लढा जुलमी निजामाविरोधात होता. त्या स्वातंञ्य लढ्यात हिंदु, मुस्लीम, बौद्ध सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रश्मी बोरीकर यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय खोकडपुरा येथे डॉ. बोरीकर त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदना नंतर उपस्थितांना संबोधित करतांना त्या बोलत होत्या. हजारो कोटींच्या घोषणा पुर्वीही झालेल्या, कालही झाल्या परंतु जमीनीवर काहीही बदल दिसत नाही. मराठवाड्याचे हक्काचे पाणी, रोजगार, विकास होतांना दिसत नाही, यासाठी आपण जागरुक नागरिक व्हायला हवे असेही आवाहन त्यांनी केले.
मराठवाठा मुक्ती संग्राम नसुन हैद्राबाद मुक्तीसंग्राम आहे. कृष्णा खोर्यातील 21 टी एम सी पाण्यावर मराठवाड्याचा हक्क आहे. सध्याचे राज्यकर्ते काही दिवसाचे पाहुणे आहेत. स्ततःच्या खिशातुन काही देत असल्याचा अविर्भाव मुख्यमंञ्याने दाखवु नये, असे प्रा. सुशिला मोराळे यावेळी म्हणाल्या.
प्राताविकात अॅड. अभय टाकसाळ म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फक्त ब्रिटीश राजवटी विरुध्द नव्हे तर गोव्यातील पोर्तूगीज, पुडूचेरी व इतरत्र फ्रेंच व मराठवाड्यावर निजामासह इतरत्र 571 संस्थानिकांविरुद्धही लोकशाही स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय कम्यूनिस्ट पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाणीवपूर्वक हैद्राबाद मुक्तीसंग्रामाला धर्मांध रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करतात.
या लढ्यात कॉ. हबीबोद्दीन, कॉ. इफ्तेकार, कॉ. नसीम, कॉ. सय्यद मखदूम, कॉ. असदभाई, कॉ. मखदूम मोयीनोद्दीन, आलम खुदमिरी, गुलाम हैदर, जावेद रझवी, आलम खुंडमिरी, सय्यद इब्राहीम, हसन अली मिजी, काजी अब्दुल गफ्फार, मिर्जा हैदर हुसेन, शहाबुद्दीन, लेखक अख्तर हुसेन, सादीक सिद्धीकी, आबीद अलीखान, महेबुव हुसेन जिगर, मयकेश हैद्राबादी, जफरून हसन, लतीफ साजीत इत्यादी अनेक मुस्लीम धर्मात जन्माला आलेले तसेच कॉ. व्ही. डी. देशपांडे, कॉ. चद्रगुप्त चौधरी, कॉ. करणाभाभी चौधरी, रतिलाल जरीवाला,
कॉ. माणिकभाई कापडीया, गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे,आदींनी निजामविरोधातील लढ्यात सहभाग घेतला. निजामाला महसुल दैणारी 25 लाख पामची झाड कापुन दलीतांनी ( जंगल सत्यागृह ) अनोख्या पद्धतीने निजामाला जेरीस आणले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पोलीस अॅक्शन‘ ची सूचना करीत घटनात्मक पेच सोडवला. या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या स्वातंत्र्यसैनिकांची नावे पाहता लक्षात येतं की, हा लढा जूलमी राजवटी विरोधात होता.