संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार थोरात यांचा सत्कार | महातंत्र








संगमनेर; महातंत्र वृत्तसेवा : सध्या देशात व राज्यात सुरू असणारे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अजिबात मान्य नाही अशा या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल जनतेत तीव्र स्वरूपाचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला भवितव्य चांगले अस ल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला

संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी फेरनिवड झाल्याबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहाच्या प्रांगणात संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याआला त्यावेळी आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी माजी आ डॉ सुधीर तांबे ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर थोरात साखर कारखान्याची व्हा चेअरमन संतोष हासे रामहरी कातोरे सुभाषसांगळे सोमेश्वर दिवटे मिलिंद कानवडे अजय फटांगरे सिद्राम दिड्डी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारीअधिकारी अनिल शिंदे यांच्यासह अमृत उद्योग समू हातील व संगमनेर तालुक्या तील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची परंपरा असून यापक्षाने सर्वसामान्यांच्या विकासा साठी कायम काम केले आहे.आपणकधी ही पदाला महत्त्व दिले नसून जनतेच्या कामांना प्राधान्य दिले आहे. पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन काम केले. जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात अनेक मंत्री पदावर काम करण्याची संधी काँग्रेसच्या नेतृत्वांनी आपल्याला दिलेली आहे . त्या संधीचा उपयोग आपण कायम सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठीकेला आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असून देशांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे .2024 मध्ये देशात आणि राज्यात नक्कीच काँग्रेस पक्ष नंबर एकचा असेल असे सांगताना महाराष्ट्रात महावि कास आघाडीचे सरकारच सत्तेवर येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की आ बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत अड चणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करताना पक्षाला चांगले यश मिळवून दिले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे त्यामुळे त्यांना आगामी काळामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तालुका ध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी आभार मानले.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *