Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आता अवघे काही महिने उरले आहेत. वर्ष निवडणुकीचं आहे. काल गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपये कपातीच्या दरानं याची चाहूल लागली आहेच. आता आज काँग्रेस (Congress) कर्नाटकात महिलांना दर महिना 2 हजार रुपयांचा भत्ता देणारी योजना लागू करत आहे. 200 विरुद्ध 2 हजारांची ही लढाई निवडणुकीच्या मैदानात कोण जिंकणार हे येत्या काळात कळेलच.
काल गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपये कपात झाली आणि ही देशातल्या तमाम महिला वर्गासाठी मोदींकडून रक्षाबंधनाची भेट असल्याचं केंद्रीय मंत्र्यांना जाहीर केलं. आज याच महिलांसाठी काँग्रेस कर्नाटकमध्ये एक भेट जाहीर करत आहे. ही भेट आहे दरमहिना 2000 रुपयांची. त्यामुळे रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर 200 विरुद्ध 2000 ची ही लढाई राजकीय पक्षांत सुरु असल्याचं दिसतंय. कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ आज राहुल गांधींच्या उपस्थितीत करण्यात आला. कर्नाटकच्या निवडणुकीत मतदारांना काँग्रेसनं जी पाच प्रमुख आश्वासनं दिली होती. त्यापैकी एक आहे गृहलक्ष्मी योजना.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
Eknath Khadse on Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून...
INDIA alliance Mumbai meeting : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचं वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला...
Most Popular CM Of India Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागांच्या संदर्भात इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला....
Lok Sabha Election 2024 AAP Seats Opinion Poll: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? यावर आतापर्यंत अनेक सर्वेक्षणं झाली आहेत. तसेच, त्यांचे निष्कर्षही समोर आले आहेत. एकूणच भाजपच्या...
2024 Lok Sabha Seat Opinion Poll Results: पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एनडीए आपली सत्ता टिकवण्यासाठी तर, विरोधकांची आघाडी असलेली इंडिया (INDIA) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर...
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी इंडिया (India Alliance) आघाडीची स्थापना केली आहे....
Lok Sabha Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या, म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातील NDA च्या खासदारांची भेट घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या...
महिलांना दरमहिना 2 हजार रुपये देणारी योजना आहे तरी काय?
प्रत्येक घरातल्या प्रमुख महिलेला दर महिना 2 हजार रुपये दिले जातील
त्यासाठी कर्नाटक सरकारनं वार्षिक 32 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे
अंत्योदय, बीपीएल आणि एपील ( अबोव्ह पॉव्हर्टी लाईन) रेशन कार्ड धारक महिलांना याचा लाभ मिळणार
प्रत्येक कुटुंबातल्या एकाच महिलेच्या नावावर हे पैसे मिळतील
सरकारी नोकरदार महिला, करदात्या महिला किंवा ज्यांच्या कुटुंबात इनकम टॅक्स, जीएसटी भरला जातो, त्यांना यातून वगळण्यात आलंय
कर्नाटकात 1.1 कोटी महिलांनी आत्तापर्यंत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.
काल केंद्र सरकारनं 7 हजार कोटींचा बोजा सहन करत गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. आता कर्नाटक सरकारनं केवळ या एकाच वर्षात 17 हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी बाजूला काढली आहे.
गृहलक्ष्मी ही कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाच प्रमुख आश्वासनांपैकी एक योजना. या पाचपैकी तीन योजना काँग्रेसनं आधीच लागू केल्या आहेत. शक्ती, गृहज्योती आणि अन्नभाग्य या तीन योजना कर्नाटक सरकारनं आधी लागू केल्या आहेत. गृहलक्ष्मीनंतर युवा निधी या योजनेंतर्गत काँग्रेस बेरोजगार युवकांनाही बेरोजगार भत्ता देणार आहेत.
अर्थव्यवस्थेसाठी अशा लोकानुयायी योजना किती लाभदायक हा चर्चेचा विषय आहे. पण वर्ष निवडणुकीचं आहे. काल भाजपकडूनही गॅस दरातल्या कपातीचा जोरदार गवगवा करण्यात आला. आता काँग्रसेनं तर थेट महिलांच्या खात्यात दरमहिना 2 हजार रुपये द्यायला सुरुवात केलीय. दोन्ही पक्ष याला महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणतायत. पण याची परतफेड करताना महिला मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणं महत्वाचं असेल.