Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा… तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा वाटा होता, तो मोहम्मह सिराजचा. सिराजच्या (Mohammed Siraj) फायनलमधील अफलातून कामगिरीचं बक्षिस आयसीसीने दिलंय. मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्याने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर (Mohammed Siraj Instagram Story) करत वडिलांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

मोहम्मद सिराजने खूप कष्टाने टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं आहे. लहानपणापासून अठराविश्व दारिद्रय, वडिल रिक्षा चालवायचे, पण घरात खाणारी तोंड भरीच.. सिराजला लहानपणापासून खेळण्याची आठव होती. मोठा भाऊ कॉलेजमध्ये जात असताना सिराजने दांड्या मारून आपली आवड जपली. सिराजची आई मात्र शिस्तप्रिय… कॉलेजात जा, दोन बुकं वाच.. पैका कमव, असं त्याची आई त्याला सांगायची. आईने लाख अडवून देखील सिराजने काही ऐकलं नाही. तो स्लिपरवर खेळायला जायचा. घरी आल्यावर त्याला आई घरात घेत नसायची. वडील कामावरून आल्यावर सिराजला घरात एन्ट्री मिळायची. वडिलांनी माझे खूप लाड केले, असं सिराज नेहमी सांगतो.

मोहम्मद सिराजने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंका बत्या गुल केल्या अन् भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर आता आयसीसीने गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली असून सिराजने क्रमांक 1 पटकावला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सिराजची रँकिंग 72 होती. मात्र, एका वर्षात सिराजने 72 मैल पार केलंय. सिराजच्या या यशानंतर त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली. त्याने इन्टाग्राम स्टोरीवर आपल्या वडिलांचा (Mohammed Siraj father) फोटो शेअर केला अन् मिस यू पप्पा असं लिहिलं आहे. 

Related News

पाहा Instagram Story

दरम्यान, आशिया कपनंतर आता वर्ल्ड कपमध्ये देखील सिराजला संधी देण्यात आली आहे. सिराज म्हणजे टीम इंडियाचा घातक गोलंदाज, अशी त्याची ओळख निर्माण झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या टीममध्ये देखील भीतीचं वातावरण तयार झालंय. आगामी वर्ल्ड कपमध्ये सिराज भल्या भल्यांच्या दांड्या मोडणार यात काही शंकाच नाही. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *