महातंत्र ऑनलाईन डेस्क : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना संसदेचा लॉगिन आयडी, पासवर्ड का दिला? याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महुआ मोईत्रा यांनी संसदेचा लॉगिन आयडी, पासवर्ड उद्योगपती हिरानंदानी दिले, तसेच संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतली, असे आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते.
महुआ मोईत्रा म्हणाल्या, “दर्शन हिरानंदानी यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीने मी लोकसभेत विचारलेले प्रश्न वेबसाईटवर टाईप केले होते. मी संसदेत प्रश्न विचारल्यानंतर ते मला याबाबत सांगत होते. त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रश्न वाचत होते. कारण मी नेहमी माझ्या मतदारसंघात व्यस्त असते. प्रश्न टाईप केल्यानंतर माझ्या मोबाईलवर याचा ओटीपी येत होता. त्यानंतर मी हा ओटीपी त्यांना सांगत होते आणि प्रश्न सबमीट होत होता. त्यामुळे दर्शन हिरानंदानी माझा आयडी घेऊन लॉगीन करत होता आणि आणि स्वत:च्या प्रश्न टाईप करत होता, असे सांगणे हास्यास्पद आहे.”
दर्शन हिरानंदानी यांनी अॅफिटेविट सादर केल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कॅश क्वेरीच्या आरोपांतून काहीही निष्पण्ण झाले नाही. याला आता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे म्हटले जात आहे. दुबे यांनी पत्रकारांना सांगितले की, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मात्र, एनआयसी लॉगिनमध्ये तुमचे लॉगिन कोण करू शकते याचे कोणतेही नियम नाहीत, असे प्रत्युत्तर मोहुआ मोईत्रा दिले आहे.
हेही वाचलंत का?