Nagar News : घरकुलांसाठी बीडीओ लाभार्थ्यांच्या थेट घरी | महातंत्र

साकत : महातंत्र वृत्तसेवा :  ज्या घरकुल लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला. त्यांनी घरकुलेचे बांधकाम करावे, अन्यथा त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. भाऊ-ताई- आजी- आजोबा घरकुले बांधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले. तालुक्यातील साकत येथे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, माजी सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजेंद्र वराट, हरिभाऊ वराट यांना बरोबर घेऊन महादेव वराट, कस्तुरबाई वराट, तुकाराम वराट यांच्यासह प्रत्येकाच्या भेटी घेतल्या. अनेकांना फोनवरून संपर्क केला. त्यांनी घरकुल बांधण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रत्येक घरकुल धारकाच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून अडचणी समजून घेतल्या.

या वेळी रोजगार सेवक हरिभाऊ वराट, रामहरी वराट, सतीश लहाने, दिलीप मुरुमकर, भाऊसाहेब मुरुमकर, नागराज मुरूमकर आदी उपस्थित होते. सात दिवस मुदतवाढ देण्यात आली असून, त्यादृष्टीने प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन घरकुल सुरू करण्यासाठी स्वतः गटविकास अधिकारी पोळ सांगत असून लाभार्थीस घरकुल बांधण्यास प्रोत्साहित करीत आहेत. घरकुलधारकांनी घरकुले लवकर पूर्ण करावीत. बांधकाम करताना काही अडचण असल्यास सर्व सहकार्य करण्यात यईल, असे सरपंच मनिषा पाटील यांनी सांगितले.

आधी घर नंतर चहा
काही घरकुल लाभार्थ्यांनी चहा-पाण्याचा अग्रह धरला. मात्र, गटविकास अधिकारी यांनी चहा-पाणी घेण्यास नकार देत तुम्हाला राहण्यासाठी घर नाही ना मग आधी घर बांधा, घर बांधल्यानंतर तुमच्याकडे चहासाठी येईल.

ज्यांना घरकुलाचा हप्ता आला आहे, त्यांनी घर बांधले नाही. त्यांनी घरकुल बांधकाम करावे, अन्यथा हप्ता वसूल करण्यात येईल.
                                            – प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड

The post Nagar News : घरकुलांसाठी बीडीओ लाभार्थ्यांच्या थेट घरी appeared first on महातंत्र.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *