नागपूर : बंदिवानांच्या आप्तांशी गळाभेटीने कारागृहाच्या भिंतींना मायेचा पाझर | महातंत्र
नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : कारागृह प्रशासनाने पुढाकार घेत ध्वज दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील कारागृहात बंदिवान व त्यांच्या पाल्यांमध्ये गळाभेटीचा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित केला होता. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात देखील आईवडीलांची भेट घेण्यासाठी चिमुकल्यांनी गर्दी केली होती. चार भिंतीच्या आड गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या जीवनात सुद्धा आनंदाचे क्षण यावे याकरिता या गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळात गळाभेट कार्यक्रम बंद करावा लागला होता. मात्र,गेल्या वर्षी पुन्हा गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. आज शेकडो बंदीवानांना त्यांच्या लहान मुलांबाळांसह कुटुंबीयांना भेटता आले.या भावनिक क्षणामुळे त्यांचे डोळे अधिकाऱ्यांचे डोळे देखील पाणावले होते.

कारागृहाच्या चार भिंतीआड असलेल्या निरव शांततेला चिरत आज लहान मुलांच्या गोंगाटाने वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली, हे गुन्हेगारी जग किती वाईट असते याची जाणीव सुद्धा बंदीवानांना झाली असावी. मुलाबाळांना भेटल्यानंतर बंदीवानांचे डोळे अक्षरशः पाणावले होते.

कारागृहाच्या गळाभेट कार्यक्रमाच्या निमित्ताने बंदीवानांच्या कुटुंबीयांना कारागृहाच्या चार भिंतीआड काय परिस्थिती असते, हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. भावनिक दृश्य बघून कारागृहातील अधिकारी सुद्धा भावनिक झाले होते अशी माहिती वैभव आगे-अधीक्षक मध्यवर्ती कारागृह यांनी दिली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *