नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान | महातंत्र
कंधार; महातंत्र वृत्तसेवा : कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी तब्बल २६ वर्षानंतर कंधार तालुक्यातील ८ बूथवर ९४.६९ टक्के मतदान झाले. १८ जागेसाठी ५७ उमेदवार या निवडणुकीत होते. आज (दि.३) झालेल्या मतदानातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कारभारी ठरणार असून निकालाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची सुरू झाली. या निवडणुकीत तीन पॅनल होते. भाजपा- सेना शिंदे गट-राष्ट्रवादी यांचा एक गट तर शेतकरी कामगार पक्ष- काँग्रेस एक गट आणि वंचित आघाडी-उद्धव ठाकरे गट व भारत राष्ट्र समिती-संभाजी ब्रिगेड यांचा एक गट अशा तीन गटात १८ जागेसाठी ५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी ११ जागा, ग्रामपंचायत निवडणुकीत ४ जागा, व्यापारी मतदारसंघात २ जागा तर हमाल मापडी मतदारसंघात १ जागा असून यासाठी ९४.६९ टक्के मतदान झाले.

कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कुरुळा २ (सेवा १, ग्रा. पं. १), बारूळ २ (सेवा १, ग्रा. पं. १) कंधार शहरात ४ (सेवा १, ग्रा. पं.१) व (व्यापारी १, हमाल १) ८ बूथ केंद्रात मतदान झाले. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ९५२ मतदान पैकी ९४१ मतदान झाले.

ग्रामपंचायत मतदारसंघात ९९३ मतदान पैकी ९६५ मतदान झाले. व्यापारी मतदार संघातून ४५० मतदान पैकी ३८८ मतदान झाले. आणि हमाल व मापाडी मतदार संघातून २०५ मतदान पैकी १७१ मतदान झाले आहेत. असे एकूण २६०० मतदान पैकी पुरुष १६६५ व महिला ७९७ असे एकूण २४६२ मतदारानी आपले हक्क बजावले.९४.६९ टक्के मतदान झाले.

उद्या (दि.४) सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे मतमोजणीस सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. आर. कौरवार यांनी माहिती दिली.

हेही वाचा :

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *