Nashik Theft Crime : सासरवाडीचे धोंड्याचे जेवण जावयाला महागात पडले! बंद घरावर चोरट्यांचा डल्ला | महातंत्र








येवला : महातंत्र वृत्तसेवा : येवल्यातील एका जावयाला सासुरवाडीला धोंडा साजरा करणेसाठी जाणे चांगलेच महागात पडले आहे. पारेगाव रोडवरील बाजीराव नगर येथे बंद घर फोडून चोरी झाल्याची घटना घडली.

येवला शहर व परिसरात भुरट्या चोरांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील बाजीराव नगर भागात नव्याने बांधकाम झालेल्या घरात राहणारे सुनील तुकाराम पोटे हे धोंडाच्या जेवणासाठी आपल्या सासरवाडीला चांदवड येथे गेले होते. त्यांच्या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवार ते बुधवारच्या मध्यरात्री घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. दरम्यान देवघरात ठेवलेले चांदीचे देव, व्हिडिओकॉन कंपनीचा एलसीडी, व रक्कम असा ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. दुसऱ्या दिवशी दूध देण्यासाठी आलेले शिवाजी काळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घरमालकांना फोन करून चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत ठसे तज्ञ व श्वानपातकाला पाचारण करून गुन्हा नोंदवून चोरीचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पगार हे करीत आहे









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *