महातंत्र ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग तिसरा विजय मिळवला आहे. या संघाने शुक्रवारी (दि.3) नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या नेदरलँडचा संघ 46.3 षटकांत 179 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी 31.3 षटकांत 180 धावांचे लक्ष्य 3 गडी गमावून गाठले. एकूण चार विजयासह आता अफगाण संघाने गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले आहे. (NED vs AFG)
नेदरलॅन्डने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाने सर्वाधिक नाबाद 56 धावा केल्या. रहमत शाहने अर्धशतकी (52) धावांची खेळी केली. अजमतुल्ला 31 धावा करून नाबाद राहिला. नेदरलँडसाठी लोगान व्हॅन बीक, व्हॅन डर मर्वे आणि साकिब झुल्फिकार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्तपूर्वी, अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅन्डचा डाव 179 धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीमध्ये नेदरलॅन्डकडून एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. त्यासह मॅक्स 42 आणि कोलिन एकरमनने 29 धावांची खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मैदानावर फारकाळ टिकता आले नाही. नेदरलॅन्डचे चार फलंदाज धावबाद झाले. तर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. नबीसह नूर अहमदने 2 तर मुजीब अल रहमानने 1 विकेट घेतली. (NED vs AFG)
अफगाणिस्तानच्या आशा कायम
या विजयासह अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. 7 सामन्यांत चौथ्या विजयासह संघ गुणतालिकेत 5व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचे 8 गुण आहेत. मागील 2 सामन्यात संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून तर पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला होता.
Mohammad Nabi’s economical three-wicket haul garners him the @aramco #POTM against the Netherlands 🎉#CWC23 | #NEDvAFG pic.twitter.com/fYuXkDb7nV
— ICC (@ICC) November 3, 2023
हेही वाचा :