औरंगाबाद8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महानगरपालिकेने 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून विविध मशीनरी आणि वाहने खरेदी केले आहेत. त्यांचे उद्घाटन मंगळवारी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेंट्रल नाका येथील यांत्रिकी विभागाचे वर्कशॉपमध्ये करण्यात आले.
खरेदी करण्यात आलेल्या मशीनरी आणि वाहनात 03 नग बॅकहो लोडर, 03 नग डिसिल्टिंग मशीन आणि 09 नग टाटा एस गोल्ड यांच्या समावेश आहे. महापालिकेकडे सध्या स्थितीत 10 नग बॅकहो लोडर आहेत. तथापि अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग, खामनदी प्रकल्प इत्यादी ठिकाणी बॅकहो लोडरची आवश्यकता नुसार बॉबकेट या अमेरिकन कंपनीचे तीन बॅकहो लोडर खरेदी करण्यात आले आहे. जीईएम पोर्टल द्वारे निविदा मागून प्रत्येकी 27 लाख 75 हजार रुपये प्रति नग या दराने एकूण 83 लाख 25 हजार रकमेत 03 नग बॅकहो लोडर खरेदी करण्यात आले आहे.

महापालिकेकडे सध्यास्थितीत फक्त तीन डिसिलटिंग मशीन आहे. ड्रेनेज चेंबर मधील कचरा आणि मलबा काढण्यासाठी आणखी तीन डिसिल्टिंग मशीन महाटेंडर द्वारे निविदा मागून 05 लाख 73 हजार रुपये प्रति नग दराने एकूण 17 लाख 20 हजार रकमेत तीन डिसिल्टिंग मशीन खरेदी करण्यात आले आहे. जीईएम पोर्टल द्वारे निविदा मागून परतीनग 05 लाख 59 हजार दराने एकूण 50 लाख 31हजार रकमेत एकूण 09 टाटा एस गोल्ड खरेदी करण्यात आले आहेत.

या सर्व वाहने महापालिकेला उपलब्ध झाले असून त्यांचे उदघाटन प्रशासकांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता अविनाश देशमुख, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ आदींची उपस्थिती होती.
टप्पा क्रमांक तीन येथे श्री गणेशाची स्थापना
मंगळवारी गणेशचतुर्थी निमित्त संभाजीनगर महानगरपालिका टप्पा क्रमांक 03 इमारतीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता अविनाश देशमुख, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) के एम फालक, आर एन संधा, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता आर एन संधा, उप अभियंता सुहास जोशी, आर पी वाघमारे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी पूजन करून गणेश स्थापना केली.