न्यूझीलंड 190 धावांनी पराभूत, पाकच्या अपेक्षा कायम: उपांत्य फेरीत पोहोचण्याची शर्यत आणखी रोमांचक

पुणे10 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

केशव महाराज : ९ षटकांत ४६ धावा देत ४ विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ १९० धावांनी पराभूत झाला. न्यूझीलंड आऊट ऑफ फॉर्म गेल्याने वर्ल्डकप स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलिया ३ पैकी २ सामने जिंकून टॉप-४ मध्ये पोहोचू शकतो. तथापि, गुरुवारी भारताचा श्रीलंकेसोबत मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत व दक्षिण आफ्रिकेचे गुण समान होतील.

Related News

खरी लढत चौथ्या क्रमांकासाठी

पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, नेदरलँड्स आणि श्रीलंका अद्यापही दावेदारांच्या यादीत आहेत. मोठे उलटफेर झाले नाही तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड शर्यतीमध्ये सर्वात पुढे राहतील. अंतिम चार संघांसाठी अशा प्रकारची समीकरणेदेखील तयार होऊ शकतात.

पाकिस्तान…

  • न्यूझीलंड-इंग्लंडचा पराभव करून गुणतालिकेत १० गुणांपर्यंत पोहोचू शकतो.
  • अफगाणिस्तानने ३ पैकी २ सामने गमवावेत.
  • श्रीलंकेने भारताकडून पराभूत व्हावे. न्यूझीलंडला १० गुण मिळवू देऊ नये.

न्यूझीलंड…

  • अफगाणिस्तान क्रिकेट संघाने एकही सामना गमावला नाही तर पाक आणि श्रीलंकेचा पराभव करत १२ गुणांसह थेट अंतिम-४ मध्ये पोहोचू शकतो.

अफगाणिस्तान

  • ३ सामने जिंकावे. १२ गुण मिळवावेत.

श्रीलंका

  • ३ सामने जिंकावे. अफगाण-पाकने १० गुणांपर्यंत पोहोचू नये.

भारत-श्रीलंका सामना आज दुपारी २ वाजेपासून. वानखेडे स्टेडियम, मुंबई

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *