Nijjar Killing : भारताच्या नाराजीनंतर कॅनडा सरकार नरम; पीएम ट्रुडो म्हणाले, ‘आम्ही चिथावणी देऊन…’ | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : कॅनडाने केलेले आरोप फेटाळून लावत भारताने कॅनडा विरोधी भूमिका घेतली आहे. या भूमिकेनंतर आता कॅनडा सरकारमध्ये मतांतर झाल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कॅनडाचे पीएम यांनी निज्जरची (Nijjar Killing) हत्या आणि भारतीय एजंट यांचे संबंध असल्याचा आरोप करुन कॅनडा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा कट असू शकतो, असा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता. यानंतर कॅनडाने भारतीय राजदुतांवरही कारवाई केली.  या आरोपानंतर भारताने नाराजी व्यक्त करत कॅनडाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भारताच्या नाराजीनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा सूर मवाळ झाला आहे. आम्ही भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नसल्याचे कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारताने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशी आमची इच्छा आहे.

कॅनडाचे पीएम ट्रुडो काय म्हणाले?

पंतप्रधान ट्रुडो यांनी मंगळवारी (दि. १९) सांगितले की, कॅनडा एका शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येबाबत भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही. नवी दिल्लीने या समस्येकडे नीट लक्ष द्यावे आणि गांभीर्याने घ्यावे अशी आमची इच्छा आहे. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे ट्रुडो म्हणाले. आम्ही हे आरोप करुन भडकवण्याचा किंवा प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करत नाही असं देखील ट्रुडो यांनी स्पष्टपणे सांगितले.

भारताने मांडलेली भूमिका

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यू प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले होते. कॅनडाच्या संसदेत केलेल्या आरोपानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानिया जोली यांनी एका उच्च भारतीय राजदूताची देशातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. भारतीय सरकारी एजंट आणि निज्जर यांच्या हत्येमध्ये “संभाव्य दुवा” असू शकतो, असे जस्टिन ट्रुडो यांचे म्हणणे भारताने पूर्णपणे फेटाळले आहे. ट्रुडो याचा दावा “निराधार” आणि “प्रेरित” असल्‍याचे म्‍हटले.

हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या

जूनमध्ये कॅनडातील प्रमुख खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *