नितीन गडकरींचा रोखठोक सल्ला: म्हणाले-नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज देऊ नका नाही तर बँक बुडायला वेळ लागणार नाही

नागपूर4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नेता भाजपाचा असो वा काँग्रेसचा असो, नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज देऊ नका. नाही तर बँक बुडायला वेळ लागणार नाही. नेत्यांच्या चिठ्ठीचा आदर करून कर्ज द्याल तर दहापैकी आठ चिठ्ठ्यांचे कर्ज बुडेल. आम्ही चिठ्ठ्या पाठवत राहु. होत असेल तर करा आणि होत नसेल तर नका करू असे रोखठोक प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कामठी येथे केले. नागपूरमधील कामठी भागात एका बॅकेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अॅड. सुलेखा कुंभारे, माजी आमदार सुधाकर कोहळे, रणजीतबाबू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी ग्राहकांसाठी चार नव्या योजना देखील जाहीर केल्या.

अमेरिकन अध्यक्षांच्या नावाने चिठ्ठी

आम्हाला रोज तीन तीन हजार लोक येऊन भेटतात. प्रत्येक जण त्याच्या कामासाठी चिठ्ठी मागतो. काल मला एकाने व्हिसा मिळाला नाही म्हणून अमेरिकन अध्यक्षांच्या नावाने चिठ्ठी मागितली. आम्ही चिठ्ठ्या देण्याचेच काम करतो. पण त्याचे परिणाम काय होतात हे आम्हाला माहिती नसते असे गडकरींनी सांगितले.

नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी ते राजकारणाबद्दल बोलले होते. देशात काय आणि राज्यात काय, सत्ताकारण, राजकारण आणि अर्थकारण नेहमीच चालते. पण याच माध्यमातून समाजकारणही करायचे असते आणि ते करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परत एकदा आपला ओढा समाजकारण करण्याकडे असल्याचे स्पष्ट केले होते. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण, सेवाकारण हेच खरे राजकारण आहे. जे चालू आहे ते फक्त सत्ताकारण आहे. सत्ताकारणही करायला हरकत नाही. पण ते करताना समाजकारणही केले पाहिजे. ते विसरता कामा नये असे गडकरी म्हणाले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *