कोणतीच ताकद मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळू करू शकत नाही: सुधीर मुनगंटीवार; म्हणाले- अफवा पसरवणारे मेजवाणी झोडणारे

औरंगाबाद9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबईला तोडण्याची भाषा केली जात आहे. इंडिया आघाडी अशा अफवा पसरवत आहे. 26 पक्ष एकत्र येवून मेजवाण्या झोडत आता राज्यात मुंबई तोडणार अशी अफवा पसरवत आहेत. ते महाराष्ट्राचा राज्याचा अपमान करत आहेत. ते राज्याच्या मुंबईच्या जनतेला समजु शकले नाही. जगातली कोणतीही ताकद मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळु करु शकत नाही, असा इशारा वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

Related News

यावेळी मुनंगटीवार म्हणाले की मुंबई तोडण्याची भाषा इथे येवून केली जात आहे.त्यापेक्षा कर्नाटक मुख्यमंत्री इ्थे आहेत. त्यानी शपथपत्र द्यावे आमचे गावे महाराष्ट्राला द्यावे तर ही बैठक सार्थकी लागली असे होईल. हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तुमचे कुटुंबात बाप मुख्यमत्री पोरगा पर्यावरण मंत्री, मामा सिंचन मत्री भाचा उर्जामत्री हे पारिवारीक सुरु आहे.यांच्या नेतृत्वात देशाचे कल्याण होणार नाही.

जनता निवडणुकीत यांना तिरडीवर नेणार

मुनगंटीवार म्हणाले की कॉंग्रेसचा शरद पवार यांच्यावर विश्वास नाही. पवारांनी पत्रकार परिषदेत सुचक वाक्य वापरले होते. त्यावेळी दोन्ही बाजुकडे पाहिले. एका बाजुला दोन नेते शिवसेनचे आणि दुसऱ्या बाजुला कॉंग्रसचे होते.ते म्हणाले की पंतप्रधान आरोप करतात कॉंग्रेस राष्ट्रवादीवर याची चौकशी पंतप्रधान महोदयानी केले पाहिजे. ते एका बाजुला चौकशी करण्याचे सुतोवाच करता आहेत. लालुप्रसाद यादव मोदींच्या नरडीला बरसायला निघाले आहेत अशी भाषा केली जात आहेत.यांचीभाषा पाहिली तर जनता मात्र यांना लोकशाही मार्गाने निवडणुकीत तिरडीवर नेल्याशिवाय राहणार नाही असा आरोप केला.

इग्रजांचा वारसा चालवायचा आहे

मुनगंटीवार म्हणाले की, या आघाडीच्या नेत्यांनी एकही कार्यक्रम आखला नाही.यांच्याकडे पंतप्रधान कोण नितीश कुमार अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांचे बोर्ड लागले आहेत. विकासाच्या गाडीवर इतके ड्रायव्हर बसवले आहेत की गाडीचा चकनाचुर आहेत.हे सत्तांध आहेत स्वार्थी आहेत.अमेरिकेत जावून भारतमातेचा मृत्यु झाला अशी निंदा करत आहेत. इंडिया शब्द कोणी लिहीला इंग्रजांनी लिहीला आहे. तुमची विचारसरणी देखील तीच आहे. हिंदुस्थान का नाही निवडला भारत का नाही निवडला, ह्युम ने कॉंग्रेस काढली इंग्रजाचा वारसा यांना चालवायचा आहे. यांना केवळ जाती जातीमध्ये भांडणे लावयाची आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *