पलटवार: कुणाचाही बाप मुंबई‎ तोडूच शकत नाही‎, देवेंद्र फडणवीसांचे उद्धवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर‎

प्रतिनिधी | मुंबई‎एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबईचा विकास रोखणारे‎ महाराष्ट्रद्रोही आहेत. मराठी‎ माणसाच्या मनात भय असेपर्यंत तो ‎‎आपल्याच पाठीशी उभा राहील,‎ असे काही जणांना वाटत असल्याने ‎‎केंद्र सरकारच्या औद्योगिक विकास ‎‎आराखड्याला विरोध करण्यात येत ‎‎आहे. पण मुंबईची घोडदौड कुणीही ‎‎थांबवू शकत नाही आणि कुणाचाही ‎‎बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रापासून ‎‎तोडू शकणार नाही, असे‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‎‎सांगितले. तर, उपमुख्यमंत्री अजित ‎‎पवार म्हणाले की, केंद्राच्या विकास ‎‎आराखड्यात पुणे, पिंपरी- चिंचवडचा ‎‎समावेश झाला पाहिजे.‎

Related News

महायुतीच्या वरळी क्रीडा केंद्रात ‎‎झालेल्या मेळाव्यात फडणवीस‎ म्हणाले की, केंद्राच्या मदतीने दीड‎ लाख कोटी रुपये उभारून महाराष्ट्र‎ दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ‎आहे. नीती आयोगाने मुंबईचा‎ आर्थिक विकास आराखडा तयार‎ करण्याची सूचना केली असून‎ त्यावरून विरोधकांनी मुंबई‎ महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव‎ असल्याचा आरोप केला. त्याचा ‎उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‎प्रत्येक शहराचा केवळ विकास ‎आराखडा तयार करून उपयोग‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नसून आर्थिक व गुंतवणुकीचाही‎ आराखडा तयार केला पाहिजे. त्या‎दृष्टीने केंद्र सरकारने 20 शहरे‎ निवडली आहेत. उत्पन्नामध्ये मुंबई‎महानगर क्षेत्राचा वाटा सहा टक्के‎ असून तो 20 टक्क्यांवर न्यायचा‎ आहे. त्याबाबत चार महिन्यांत‎ आराखडा तयार करण्यात येणार‎ असून नीती आयोग व केंद्र सरकार‎ मदत करणार आहे. मुंबईचा विकास‎ होत असल्याने जनतेचा बुद्धिभेद‎ केला जात आहे, असे ते म्हणाले.‎

जनतेची दिशाभूल‎ करण्याचा प्रयत्न‎

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले‎ की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर‎ मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा‎ प्रयत्न असल्याची ओरड ही जनतेची‎ दिशाभूल आहे. हा आरोप खरा‎ असेल, तर वाराणसी उत्तर‎ प्रदेशपासून, सुरत गुजरातपासून‎ आणि विशाखापट्टणम आंध्र‎प्रदेशपासून तोडायचे आहे का?‎ उलट पुढील काळात पुणे, ‎पिंपरी-चिंचवडचीही निवड करावी, ‎अशी विनंती मी केली आहे. युतीत‎ कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणांशी‎ तडजोड होणार नाही. पण‎ कार्यकर्त्यांनी सहकारी पक्षांच्या‎ नेत्यांबद्दल टीकाटिप्पणी टाळावी.‎

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *