मॅचच नाही Mohammed Siraj याने काळीज देखील जिंकलंय; विजयानंतर केली मोठी घोषणा!

Asia Cup 2023 final : टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. भारताने 10 विकेट्सने सामना नावावर केला अन् आठव्यांदा आशिया कप नावावर केला आहे. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो मोहम्मद सिराज (Mohammad Siraj)… मियां मॅजिकने आज घातक गोलंदाजी करत 7 ओव्हरमध्ये 21 धावा देत 6 गडी (Mohammed Siraj 6 wickets) तंबुत पाठवलं. त्यामुळे मोहम्मद सिराजचं सध्या कौतुक होताना दिसत आहे. विजयानंतर जेव्हा सिराजला बोलवण्यात आलं, तेव्हा त्याने आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर त्याने मोठी घोषणा करत सर्वांची मनं जिंकली आहेत.

नेमकं काय म्हणाला मोहम्मद सिराज?

मला सामना खेळताना एखाद्या स्वप्नासारखं वाटलं. गेल्या वेळी मी त्रिवेंद्रममध्ये श्रीलंकेविरुद्ध असंच केलं होतं. त्यावेळी मला 4 विकेट लवकर मिळाल्या, त्यावेळी मला 5 विकेट मिळवता आल्या नाहीत. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळतं हे लक्षात आलं, असं म्हणत सिराजने खंत व्यक्त केली. मात्र, त्यावेळी त्याने आजच्या कामगिरीवर आनंद देखील व्यक्त केला आहे.

आज जास्त प्रयत्न केला नाही. मी नेहमी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्विंग पाहतो. मागील सामन्यांमध्ये फार काही आढळलं नाही. पण आज तो स्विंग होत होता आणि मला आऊटस्विंगरने जास्त विकेट्स मिळाल्या. बॅटर्सना गाडी चालवायची होती, टीम इंडियाच्या फलंदाजांनी चोख कामगिरी केली, असं मोहम्मद सिराज म्हणाला आहे.

Related News

स्पर्धेचं हे रोख पारितोषिक मैदानावरील ग्राऊंड स्टाफला जातं. ते नसते तर ही स्पर्धा शक्यच झाली नसती. सर्व श्रेय घेण्यासाठी ते पात्र आहेत, असं म्हणत मोहम्मद सिराजने सर्वांचं काळीज जिंकलं आहे. 5,000 हजार डॉलर सिराजने  ग्राऊंड स्टाफला दिले आहेत.

आणखी वाचा – Mohammed Siraj : सिराजचा लंकेवर ‘सर्जिकल स्टाईक’, एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली; पाहा Video

दरम्यान, अचूक टप्पा अन् परफेक्ट लाईन आणि लेन्थच्या आधारावर सिराजने टप्प्यात गोलंदाजी केली अन् श्रीलंकेचा कार्यक्रम केला. श्रीलंकेच्या प्रमुख फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय खिशात घातला आहे. 

जय शाहा यांची मोठी घोषणा

बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला 50,000 अमेरिकन डॉलर (42 लाख रुपये) जाहीर केले आहेत.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *