महातंत्र ऑनलाईन डेस्क : क्विंटन डि-कॉक आणि वॅन डॅर ड्यूसेनची शतकी खेळी आणि केशव महाराजच्या फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर तब्बल १९० धावांनी विजय मिळवला. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, द. आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात न्यूझीलंडला अपयश आले. (NZ vs SA)
दक्षिण आफ्रिकेने डि-कॉक ११४ चेंडू ११६, वॅन डॅर ड्यूसेन ११८ चेंडूमध्ये १३३ आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३५७ धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर ३५८ धावांचे आव्हान ठेवले. द. आफ्रिकेच्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला १६७ धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलीप्सने ६० चेंडूमध्ये ५० धावांची खेळी केली. फिलीप्सशिवाय कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक ४ विकेट्स पटकावल्या. शिवाय मार्को जेन्सन ३ तर कॉर्टजेने २ विकेट्स पटकावत आफ्रिकेचा विजयाचा मार्ग मोकळा केला. (NZ vs SA)
द. आफ्रिकेची फलंदाजी (NZ vs SA)
सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना आफ्रिकेचा कर्णधार बवुमा 24 धावाकरून बाद झाला. यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकी खेळी खेळली. ड्युसेनने 118 चेंडूत 133 धावा केल्या. डी कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. डुसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. डी कॉक आणि व्हॅन दर दुसेनने दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदापी केली. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले. (NZ vs SA)
दक्षिण आफ्रिका संघ : : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी. (NZ vs SA)
न्यूझीलंड संघ : : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर,कर्णधार),ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट. (NZ vs SA)
South Africa move to the top of the #CWC23 points table with a thumping win in Pune 💪#NZvSA 📝: https://t.co/MKlk1hNkJe pic.twitter.com/5w9RhDJ7Of
— ICC (@ICC) November 1, 2023