सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी ‘अकोला जिल्हा बंद’ची हाक: अत्यावश्यक सेवा वगळणार; व्यापारी, शिक्षण संस्थांना देणार पत्र

अकोला20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समजातर्फे शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी ‘ जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे.

Related News

या बंदबाबतचा निर्णय मंगळवारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बंदमधून आरोग्य, भाजी-पाला, दुधसह अन्य अत्यावश्यक सेवा वगळ्यात येणार आहेत. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संंस्थांसह अन्य संबंधितांना पत्र देण्यात आहे. त्यानंतर बंदबाबतचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

२ सप्टेंबर रोजी अकोला महानगरात राजकीय पक्ष, मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मूर्तिजापूर रोडवर केलेल्या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक संथ झाली होती. दरम्यान आता सकल मराठा समाजातर्फे शहरासह संपूर्ण जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

काय राहणार बंद

वाहन, कापड, दागिने, इलेक्ट्रॉनिक्ससह सर्व प्रकारची शो रुम्स.

किराणा, कापड, सौंदर्य प्रसादने, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, पाठ्यपुस्तकांची दुकाने.

इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, हार्डवेअर, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मद्य विक्रीची दुकाने.

सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी,चित्रपट गृह.

कृषी सेवा केंद्र.

हे राहणार सुरू

बंदमधून रूग्ण सेवा वगळ्यात आली आहे. त्यामुळे विविध रूग्णालये, बाह्यरुग्णांची तपासणी होणारे सर्वच प्रकारचे दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब, रक्तपेढी सुरू होणार आहेत.

भाजापाला, फळ, दुध विक्री सुरू राहणार आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालये, वित्तीय संस्थांच्या सेवा (बँक, पतसंस्था) िनयमितपणे सुरूच राहणार आहेत.

अत्यावश्यक स्थितीत ऑटोरिक्षा, खासगी प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.

बंद शांततेत पाळणार

बंद अतिशय शांततापूर्ण वातावरणात पाळण्यात येणार असून, या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेपुर खबरदारी घेण्यात येणार आहे. भविष्यात कोणत्याही समाजाच्या आंदोलनाबाबत असा अनुचित प्रकार घडू नये, याचाही इशारा या बंदच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे सकल मराठा समाजातर्फे कळवण्यात आले आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *