पुणे31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
फुले- शाहू – आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके सर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते मार्गदर्शक होते.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे नरके सरांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज हरी नरके सर यांच्या निवासस्थानी छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत नरके परिवाराला 25 लाखांची आर्थिक मदत दिली गेली.
प्रा. हरी नरके सर यांचे प्रत्येक क्षेत्रातले योगदान खूप मोठे आहे. त्यांची अनेक भाषणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेली आहेत त्यांनी केलेले पत्रव्यवहार देखील अभ्यास करण्यासारखे आहेत त्यामुळे ही सर्व भाषणे, त्यांचे लेख, त्यांचे पत्रव्यवहार हे जतन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी आमदार पंकज भुजबळ यांनी दिली.
प्रा. हरी नरके सर हे समता परिषदेचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते आज आमचा आधारस्तंभ आमच्या मध्ये नाही परंतु आम्ही समता परिषदेच्या वतीने हरी नरके सर यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम घेत राहू अशी माहिती देखील पंकज भुजबळ यांनी दिली.
यावेळी अखिल भारती महात्मा फुले समता परिषदेच्या महिलाध्यक्षा मंजिरी धाडगे, वैष्णवी सातव, गौरी पिंगळे, सपना माळी, नागेश गवळी, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, शिवराम जांभूळकर , सागर दरोडे, प्रदीप हुमे, त्याचबरोबर प्रा. हरी नरके यांच्या पत्नी संगीता नरके आणि मुलगी प्रमीती नरके यावेळी उपस्थित होते.
