ऐन गणेशोत्सवात कांदा रडवणार, गृहिणींचे बजेट कोलमडणार; किती असेल भाववाढ?

Onion Price Hike: टोमॅटो, आलं आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडल्यानंतर आता गृहिणींना कांदाही रडवणार आहे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता कांद्याचे भावही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुरवठा कमी होत असल्याने या महिन्याच्या अखेरील 60 ते 70 किलोने वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सव काळात कांद्याचे भाव गडगडणार आहेत. 

मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने त्याचा परिणाम कांद्यांच्या किंमतीवर होण्याची जास्त आहे. किरोकोळ बाजारात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कांद्यांला चांगला भाव मिळणार आहे. एका किलोसाठी 60 ते 70 किलोपर्यंत कांद्याला भाव मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होताना दिसत आहे. सध्या कांद्याचा भाव 30 ते 35 किलो इतका आहे. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे कारण हे अवकाळी पाऊस असल्याचं म्हटलं जात आहे. 

अवकाळी पावसाचा कांद्याला फटका

अवकाळी पावसामुळं कांद्याचा दर्जा घसरला आहे. त्याचबरोबर बाजारात सध्या हलत्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठेबाजी केलेला कांदाही पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळं येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढू शकतात. काही राज्यांना पूराचा फटका बसला आहे. पूर आणि पावसामुळं राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. 

Related News

एका अहवालानुसार, रब्बी कांद्याचा साठा आणि वापराचा कालावधी दोन महिन्यांनी कमी झाल्याने आणि यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारात रब्बीचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या घसरण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. त्यामुळं कांद्यांच्या भावात वाढ होऊ शकते. 

ऑक्टोबरमध्ये भाव कमी होण्याची शक्यता

ऑक्टोबरपासून खरीपाची आवक सुरू होईल तेव्हा कांद्याचा पुरवठ्यात वाढ होईल व त्यामुळं कांद्याच्या भावातही घसरण होईल, असे या अहवालात म्हटले आहे. सणासुदीच्या महिन्यांत (ऑक्टोबर-डिसेंबर) कांद्याच्या भावातील चढ-उतारदेखील दूर होतील, असे सांगण्यात येत आहे.

टोमॅटो, कोथिंबीर, कडधान्य, डाळी पाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ झाली तर गृहिणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेच बिघडणार आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *