तुळजापूर : कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांची मोठी गर्दी | महातंत्र
तुळजापूर; महातंत्र वृत्तसेवा : आई राजा उदो उदो… सदानंदीचा उदो उदो.. या  जयघोषामध्ये तुळजापूर नगरी दुमदुमून निघाली. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून निघाले असून सलग 22 तास भाविकांना दर्शन दिले गेले सुमारे 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे.

शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून दोन दिवसापासून सुरू असलेली भाविकांची गर्दी कायम होती. दर्शन मंडपाचे सर्व मजले भाविकांच्या गर्दीने खचाखच भरलेले असून 3 दिवसापासून तुळजापूर मध्ये भाविकांची येणारी गर्दी कायम सुरू आहे. तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र येथील वेगवेगळ्या भागांमधून लोक चालत आणि खाजगी वाहनाने तुळजापूरला येत आहेत. नळदुर्ग महामार्ग, सोलापूर महामार्ग, लातूर महामार्ग आणि धाराशिव महामार्ग, बार्शी मार्ग अशा वेगवेगळ्या पाच भागांमधून भाविकांची गर्दी तुळजापुरात येत आहे. शहराच्या बाहेर 2 किलोमीटर अंतरावर लहानपणाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांच्या गाड्या पार्क करून भाविकांना शहरांमध्ये आणले जात आहे. महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र तुळजापूर बस स्थानकाच्या मुख्य स्थानकात भाविकांना सोडत आहेत व तेथूनच बाहेर पडण्याचा सर्व गाड्या भाविकांसाठी उपलब्ध केलेले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १३५० ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.  कर्नाटक विभागाच्याही बस सेवेत आहेत. तुळजापूर बस स्थानकामध्ये कर्नाटक राज्याच्या बस गाड्यांना थांबू दिले जात नसल्याने या बस लातूर रोडवरील रस्त्यावरच उभ्या राहतात आणि तेथूनच प्रवासी वाहतूक करीत आहेत. कर्नाटकाच्या बस गाड्या आणि भाविकांना मात्र तुळजापूरच्या प्रशासनाकडून कोणत्याही सहकार्य मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्नाटक बस प्रशासन आणि भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दुपारी 1वाजता सोलापूर येथील शिवलाल तेली समाजाच्या मानाच्या काठ्या तुळजापुरात आल्या नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार ,  अधीक्षक वैभव पाठक अभियंता अशोक संगले व इतर कर्मचारी यांनी काट्याचे शहराच्या सीमेवर स्वागत केले. वाजत गाजत आणि जल्लोष मध्ये एका येथील पुजारी सचिन पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या तेथे पुजारी सचिन पाटील यांनी मानकर यांचे स्वागत केले.

तुळजाभवानी मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर येथे सालाबादप्रमाणे आर आर किराड परिवार, पुणे तर्फे श्री देवी चरणी फुलांची आरास करण्यात आली. ह्या वेळी राम वरदायिनी, घाटशिलेचे देखावे करण्यात आले व संपूर्ण मंदिर परिसराला फुलांनी सजवण्यात आले. राजे शिवाजी महाराज निंबाळकर दरवाजा होम कुंड देवीचे मुख्य मंदीर आणि मंदिर परिसर येथे विविध 14 प्रकारच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आले यासाठी 40 फुलांचे कामगार रात्रभर काम करत होते. या निमित्ताने उद्योजक आर आर किराड यांचा सत्कार करण्यात आला.

मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, आर्य चौक, कमान वेस, भवानी रोड कार पार्किंग परिसर जिल्हा परिषद प्रशाला परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर धाराशिव रोड नळदुर्ग रोड सोलापूर रोड तुळजापूर खुर्द रोड या सर्व भागात भाविकांची गर्दी फुलून निघाली होती. जिकडे पहावे तिकडे भाविकांची गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांना चार तासाचा वेळ लागला.

मध्यरात्री बारा वाजता तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा पूर्ण झाली त्यानंतर तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि  पुजारी यांच्याकडून भिंगारच्या पलंगावर निद्रिस्त असणाऱ्या तुळजाभवानीच्या मूर्तीस मुख्य गाभाऱ्यातील चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आले. दरम्यान चंद्रग्रहण असल्यामुळे सुती कपड्यांमध्ये देवीला सोव ळ्यामध्ये ठेवण्यात आले. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर पुढील धार्मिक विधी पार पडले. सकाळी सात वाजता दही दुधाचे अभिषेक करण्यात आले देवीची यथा सांग पूजा संपन्न झाली, दरम्यान भाविकांचे दर्शन मात्र सुरू होते जलद गतीने दर्शन देण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या त्यामुळे भाविकांना चार तासाच्या वेळेमध्ये दर्शन मिळाले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *