एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा! पुण्यातील अजब प्रकार

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांचा ओबीसीमध्ये (OBC) समावेश करावा आणि आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्विकारला असून पुरावे असणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप देखील सुरु केलं आहे. मात्र पुण्याच्या (Pune News आंबेगाव तालुक्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. आंबेगावमध्ये एक भाऊ कुणबी तर एक मराठा असा उल्लेख कागदपत्रांवर करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे येथे सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा नोंद आहे. मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड होत आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर एकावर कुणबी आणि आणि एकावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. याबाबत शाळेने तसे पत्रही सादर केले आहे. त्यामुळे अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. जना कृष्णाजी आंबटकर – कुणबी, सुदाम कृष्णाजी आंबटकर – हिंदू मराठा अशी नोंद या दोन भावांच्या दाखल्यावर आहे. मात्र अजूनही अनेक जणांची अशीच नोंद निघत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Related News

“1925 पर्यंत प्रमाणपत्रावर कुणबी दाखवलं जात होतं. त्यापुढे मराठा लागलं गेल. त्यावेळी एका भावाच्या नावावर मराठा तर दुसऱ्या भावाच्या प्रमाणपत्रावर कुणबी असा उल्लेक करण्यात येऊ लागला. 1935 पासून पुढे प्रमाणपत्रावर मराठा उल्लेख करण्यात येऊ लागला. मुळात महाळुंगे गाव कुणबी आहे असे मानून शासनाने दाखले द्यावेत. पूर्वीच्या दाखल्यामुळे हा प्रकार घडला आहे,” असे मोडीलिपी वाचक दादाभाऊ चासकर यांनी सांगितले.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *