खुलताबादला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव धरणामध्ये २७ टक्केच साठा: आगामी नियोजनाचा विभागीय आयुक्तांनी मागवला अहवाल

खुलताबादएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • २४.५० दलघमी क्षमतेच्या धरणात आता ९.०९ दलघमी साठा

खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव प्रकल्पात केवळ २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांनी खुलताबाद नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा सूक्ष्म नियोजनाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागवला आहे.

Related News

पावसाळ्याचे तीन महिने उलटले, तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील येसगाव मध्यम प्रकल्प, गंदेश्वर प्रकल्पासह छोटे-मोठे तलाव व पाझर तलाव आणि विहिरी तळ गाठत आहेत.

२०११ जनगणनेनुसार खुलताबाद शहराची लोकसंख्या १५ हजार ७४९ असली तरी आजघडीला शहराची लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे. शहरात २६०० पेक्षा जास्त नळ कनेक्शन असून शहरात जवळपास १२ लाख लिटर पिण्याचे पाणी दुसऱ्या व तिसऱ्या दिवसी सोडले जात आहे. उरुसात लागणार लाखो लिटर पाणी : खुलताबाद येथे याच महिन्यात मोठा उरूस सुरू होत आहे. त्यामुळे याचेही प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.

येसगाव धरणात असलेल्या विहिरींमध्ये साचलाय गाळ

खुलताबाद नगरपालिकेने येसगाव धरणात खोदलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींनी २०१८-१९ च्या दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांची तहान भागवली होती. २०२०-२१ मध्ये धरण १०० टक्के भरले होते. आता या विहिरीत गाळ साचला आहे. विहिरी उघड्या झाल्यावर गाळ उपसा करावा लागणार आहे.

२०१८-१९ मध्ये टँकरने पाणीपुरवठा

२०१८-१९ साली दुष्काळी परिस्थितीमुळे खुलताबाद शहराला टँकरने पाणीपुरवठा केला होता. छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वेरूळ व शूलिभंजचे खाकसार तलावातून टँकरने पाणीपुरवठा केला होता.

गंदेश्वर प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याला गळती

राज्य शासनाने पाणीपुरवठा योजना मंजूर करून गंदेश्वर प्रकल्पाचे पाणी येसगाव धरणात आणले होते. १० कोटींच्या वर खर्च करून गंदेश्वर प्रकल्पात नवीन विहीर व गंदेश्वर ते येसगाव प्रकल्पापर्यंत पाइपलाइन असे काम पूर्ण करून शहराची पाण्याची समस्या मिटवली होती, परंतु आज रोजी गंदेश्वर-येसगाव पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *