कृषी: पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील मूग, उडिद पीकाकरिता नुकसान भरपाईचे आदेश

पुणे8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम 2023 योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत शिरुर तालुक्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील मूग आणि उडिद पीकाकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश एचडएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, मुंबई यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील 3-4 आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट-वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी-जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव) व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची तरतूद आहे.

पर्जन्यातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधीक सूचकाच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार मूग व उडिद पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिरूर तालुक्यातील शिरूर, निमोणे, रांजणगाव गणपती महसूल मंडळ गट आणि टाकळी हाजी, मलठण या मूग पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळ गटात; तसेच पाबळ, मलठण, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा, टाकळी हाजी या उडिद पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे 50 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

मूग पिकाच्या अनुषंगाने शिरूर, निमोणे, रांजणगाव गणपती महसूल मंडळ गटामध्ये मागील 7 वर्षाची सरासरी उत्पादकता 454.8 किलो प्रतिहेक्टरी असून संयुक्त सर्वेक्षणानुसार 42.94 किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत सुमारे 90.59 टक्क्याची घट दिसून येत आहे. टाकळी हाजी, मलठण महसूल मंडळ गटात 416.96 किलो प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत संयुक्त सर्वेक्षणानुसार 46.10 किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत सुमारे 88.94 टक्क्याची घट दिसून येत आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *