Rohit sharma, PAK vs IND : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 4 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन धक्कादायक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता पाऊस आला तरी टेन्शन नाही, अशी चर्चा होताना दिसत आहे. रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे दोन योग्य निर्णय घेतले.
पाकिस्तान संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच संघ जाहीर केला होता. मात्र, रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर कोण खेळणार याचे पत्ते उघडले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन रोहितने संघात बदल केले आहेत. रोहित शर्माने संघात कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पेपरवर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांचे संघ तोडीस तोड आहेत. मात्र, दोन्ही संघात एक्स फॅक्टर आहे तो कुलदीप यादव. चायना मॅन गोलंदाज (Kuldeep Yadav) फक्त भारताकडे आहे. याचाच फायदा रोहित शर्माने घेतलाय. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सर्वात प्रभावी ठरलाय तो भुवनेश्वर कुमार… भुवीला रिप्लेस कोण करणार? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता स्विंगर बॉलर म्हणून शार्दुलला (Shardul Thakur) संधी मिळाली आहे. त्यामुळे पाऊसामुळे बॉलिंगची ग्रीप जरी गेली तरी शार्दुल विकेट घेऊ शकतो. तर कुपदीप आणि जडेजा देखील अखेरच्या वेळात कमाल दाखवू शकतात.
Related News
World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, सात वर्षात पहिल्यांदा असं घडलं
सायन्स ऑफ क्रिकेट : पुल शॉट: रोहित प्रत्येक 5व्या पुल शॉटवर षटकार मारतो, या शॉटमागे विज्ञान काय
विश्वचषकातील वाद: अंपायरची कॅप कशी गायब झाली, अंडरआर्म बॉलिंगवर बंदी; 2011 मध्ये दोनदा टॉस का झाला?
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल
ICC World Cup : एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो…
इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास… म्हणतोय ‘आमचे 1 लाख फॅन्स येणार!’
तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर
बाऊंड्रीलाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा ‘हा’ माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?
Shreyas Iyer : खांद्याची दुखापत अन् परिस्थितीशी झगडला, श्रेयस अय्यरचं वादळी शतक; पाहा Video
IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video
‘मी कुलदीप यादवला संघात घेऊ शकत नाही कारण…’; इंझमामनं पत्रकारांना सांगितलं कारण
BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार…; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज
& Let’s GO!
Follow the match https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvPAK pic.twitter.com/3E3lvstWdX
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पाहा Playing XI
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.