PAK vs NZ : फखर जमानने राखली पाकिस्तानची लाज; पॉईंट्स टेबलमध्ये बिघाड अन् सेमीफायनलची चुरस रंगली!

Semi-Final Qualification Scenario for Pakistan :  पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना (PAK vs NZ) अखेर पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण डकवर्थ लुइस नियमानुसार (DLS method) पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित केलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खात्यात दोन अंकाची भर पडली आहे. त्यामुळे आता सेमीफायनलची (Semi-Final Scenario) चुरस आणखीच रंगत आल्याचं पहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने यावेळी 108 धावांची दमदार खेळी साकारली, तर केन विल्यम्सनचं शतक हुकलं. त्याने 95 धावा केल्या. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरलेल्या फखर जमानने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पाकिस्तानच्या डावातील 26 वी ओव्हर सुरू असताना पावसाने एन्ट्री केली अन् न्यूझीलंडच्या स्वप्नांवर पाणी सोडलंय. 

पाकिस्तानच्या नाड्या श्रीलंकेच्या हातात

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा फक्त 1-1 सामना बाकी आहे. त्यामुळे आता जर न्यूझीलंडने आगामी सामना 50 रन्सने जिंकला तर पाकिस्तानला त्यांचा पुढील सामना 180 धावांनी जिंकावा लागेल. जर न्यूझीलंड त्यांच्या श्रीलंकेविरुद्धचा एकमेव सामना 1 रनने जिंकला तर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धचा एकमेव सामना 131 धावांनी जिंकावा लागेल. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला आगामी दोन्ही सामने हरावे लागतील. त्यामुळे आता पाकिस्तानच्या नाड्या श्रीलंकेच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Points table चं गणित बिघडलं

न्यूझीलंडच्या विजयानंतर पाकिस्तानचा संघ सध्या 8 गुण आणि +0.036 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ +0.398 नेट रनरेट आणि 8 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर सेमीफायनलच्या स्पर्धेत अफगाणिस्तान देखील आहे. मात्र त्यांचा नेट रनरेट -0.330 आहे. त्यामुळे खरी चुरस पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात असेल, अशी शक्यता आहे.

Related News

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *