पंकजा मुंडे यांचा राज्यात ४ सप्टेंबर पासून ‘शिव-शक्ती’ परिक्रमा | महातंत्र








परळी वैजनाथ; महातंत्र वृत्तसेवा : श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या येत्या ४ सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. ४ तारखेला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर पासून या दर्शन दौऱ्याला सुरवात होणार असून समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत. प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत.

पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचे दर्शन घेतले. या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद पहायला मिळाला. ४ सप्टेंबर रोजी पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करणार आहेत. सकाळी ८ वा. त्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतील, तत्पूर्वी सकाळी ७ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील पांडूरंग काॅलनी गारखेडा परिसरात संत भगवान बाबा मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील.

 शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास

  • ४ सप्टेंबर – सकाळी ८ वा.
    घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर), दुपारी ३.३० वा. सप्तश्रृंगी गड वणी (जि. नाशिक), सायं ६ वा. दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट,
  • ५ सप्टेंबर सकाळी ७.३० वा.
    त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), दुपारी ४ वा. भीमाशंकर (जि. पुणे),
  • ६ सप्टेंबर सकाळी १०.१५ वा.
    जेजुरी, दुपारी १२.१५ वा.शिखर शिंगणापूर दर्शन (जि. सातारा ), रात्रौ ८.३० वा. कोल्हापूर (जि. कोल्हापूर) येथे अंबामातेचे दर्शन
  • ७ सप्टेंबर दुपारी १ वा. पंढरपूर(जि.सोलापूर), संध्याकाळी ६.३० वा. अक्कलकोट
  • ८ सप्टेंबर सकाळी ११ वा. गाणगापूर दर्शन, सायं ५ वा. तुळजापूर (जि. धाराशीव) भवानी देवीचे दर्शन,
  • ९ सप्टेंबर सकाळी ११ वा. करमाळा, दुपारी २.१० वा. पाटोदा (जि. बीड) येथे संत भगवानबाबा जयंती कार्यक्रम,
  • १० सप्टेंबर औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथे दर्शन,
  • ११ सप्टेंबर परळी (जि. बीड) येथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाने परिक्रमा समाप्त होईल.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *