पारुल चौधरीने पदक नसले तरी ऑलिम्पिक तिकीट मिळवले | महातंत्र








बुडापेस्ट, वृत्तसंस्था : जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 ची यशस्वीपणे सांगता झाली आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतासाठी पारुल चौधरीने 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला.

पारुल चौधरी ही मेरठच्या एका शेतकर्‍याची मुलगी आहे. पारुल एकेकाळी गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात होती. आता ती 2024 मध्ये पॅरिस येथे होणार्‍या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

भारताच्या पारुलने 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये 11 वा क्रमांक पटकावला. तिने ही शर्यत 9 मिनिटे 15.31 सेकंदात पूर्ण केली. ब्रुनेईच्या विन्फ्रेड मुटिले यावीने 8 मिनिटे 54.29 सेकंदांसह शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. याशिवाय केनियाच्या बीट्रिस चेपकोचने 8 मिनिटे 58.98 सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. केनियाच्या आणखी एका खेळाडूने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.

पारुल सुरुवातीला 200 मीटरपर्यंत जबरदस्त लयीत दिसली आणि प्रथम क्रमांक राखला, पण हळूहळू तिचा वेग कमी होत गेला आणि शेवटी तिला 11 व्या स्थानी समाधान मानावे लागले. पारुल 2900 मीटरपर्यंत शर्यतीत 13 व्या क्रमांकावर होती, मात्र शेवटच्या 100 मीटरमध्ये तिने आपला वेग वाढवला आणि 11 व्या स्थानावर आली.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *